सुमित नागल हरला तरी मिळाले 1 कोटी रूपये

अनिरुद्ध संकपाळ

भारताचा स्टार टेनिसपटू सुमित नागलने यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन पुरूष एकेरी स्पर्धेत इतिहास रचला.

सुमित नागलने ऑस्ट्रेलियन ओपनची पात्रता फेरी पार करत मुख्य स्पर्धेत प्रवेश केला होता.

तो याच्यावरच थांबला नाही तर त्याने पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत 31 व्या स्थानावर असणाऱ्या अलेक्झांडरचा सरळ सेटमध्ये पराभव देखील केला.

मात्र सुमित नागलला दुसऱ्या फेरीत चीनच्या शँगने 6-2, 3-6, 5-7, 4-6 असा पराभव केला. जरी सुमितचा पराभव झाला असला तरी त्याच्या झुंजार खेळीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

काही महिन्यांपूर्वी सुमितने त्याच्या अकाऊंटमध्ये 1 लाख रूपये देखील नसल्याचं सांगत क्रीडा खात्याकडे मदतीचे आवाहन केलं होतं.

मात्र आता सुमित नागलने ऑस्ट्रेलिया ओपनच्या पहिल्या फेरीत विजय मिळवल्याने त्याला जवळपास 1 कोटी रूपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत.

अय्यर की राहुल... पाचव्या क्रमांकासाठी कोणाची प्रबळ दावेदारी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.