थेट कोचच्या मुलीच्या प्रेमात पडला सुनील छेत्री अन्...

Kiran Mahanavar

सुनील छेत्री

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने निवृत्ती जाहीर केली आहे. पण सुनील छेत्रीची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे.

Sunil Chhetri Wife Love Story With Sonam Bhattacharya

प्रेमकहाणी

सुनील आणि सोनमचे 2017 मध्ये लग्न झाले होते. याआधी ते 13 वर्षे एकमेकांना डेट करत होते. यांची प्रेमकहाणी एखाद्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही.

Sunil Chhetri Wife Love Story With Sonam Bhattacharya

कोच सुब्रतो भट्टाचार्य

खरंतर सोनम ही सुनील छेत्रीचे प्रशिक्षक सुब्रतो भट्टाचार्य यांची मुलगी आहे. छेत्री एकदा मोहन बागानमध्ये सुब्रत भट्टाचार्यच्या नेतृत्वाखाली खेळला होता.

Sunil Chhetri Wife Love Story With Sonam Bhattacharya

पहिली भेट

सुनील छेत्रीने एका मुलाखतीत सोनमसोबतच्या भेटीचा किस्सा शेअर केला होता. छेत्रीने सांगितले की, त्याचे वडील माझे कोच होते. त्यामुळे त्यांच्या घरात माझ्याबद्दल अनेकदा चर्चा व्हायची, त्यानंतर सोनमला माझ्याबद्दल जाणून घेण्यात रस वाटू लागला. त्यावेळी मी 18 वर्षांचा होता आणि सोनम फक्त 15 वर्षांची होती.

Sunil Chhetri Wife Love Story With Sonam Bhattacharya

वडिलांच्या फोनमधून चोरीला नंबर

छेत्रीने सांगितले होते की, सोनमने तिच्या वडिलांच्या फोनवरून माझा नंबर चोरला होता आणि नंतर मला एक टेक्स्ट मेसेज पाठवला होता की मी तुमची खूप मोठी चाहती आहे. आणि मला तुला भेटायचे आहे. ही मुलगी कोण आहे हे मला माहीत नव्हते.

Sunil Chhetri Wife Love Story With Sonam Bhattacharya

गुपचूप भेट

सततच्या प्रवासामुळे छेत्री आणि सोनम फार कमी भेटत होते. वर्षातून दोन-तीन वेळाच भेटता येत होते. यामुळे ते सिनेमागृहात गुपचूप भेटत होते. पण इथे कधी ते दोघे एकत्र आत गेले नाहीत.

Sunil Chhetri Wife Love Story With Sonam Bhattacharya

लग्नाची मागणी

अनेक वर्षांनंतर छेत्रीने हिंमत एकवटली आणि सोनमसोबतच्या लग्नाबद्दल त्याच्या प्रशिक्षकाशी बोलले. मात्र, छेत्रीला भीती वाटल्याने काहीही झाले नाही. काही वेळ विचार करून कोचने लग्नाला हो म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Chhetri Wife Love Story With Sonam Bhattacharya