हा तर हुबेहूब सुशांत सिंग राजपूतचं...

सकाळ डिजिटल टीम

तोच चेहरा तिच स्माईल. सोशल मिडियावर व्हायरल होतोय सुशांत सिंग राजपूतचा हुबेहूब

SSR | sakal

सुशांत सिंग राजपूत जून 2020 मध्ये हे जग सोडुन गेल्याने चाहत्यांची मन दुखवली होती. त्याचा मृत्यूचं कारण अजूनही समजू शकलं नाही.

SSR | sakal

सुशांत सिंग राजपूतला जाऊन ३ वर्ष पुर्ण झाली आहेत. परंतु चाहते अजूनही त्याच्या आठवणीमध्ये असतात. अशातच सोशल मिडियावर सुशांतच्या हमशक्लचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असल्याने चाहत्यांमध्ये उत्साह आहे.

SSR | sakal

सुशांत सारखा सेम दिसणार हा व्यक्ती ज्याचं नाव डोनिम अयान असून त्याने अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये डोनिम सेम टू सेम सुशांत सारखा दिसत असल्याने चाहते भावूक झाले आहे.

SSR | sakal

काही चाहते या व्यक्तीला ट्रोल देखील करत आहेत, तर काही चाहते व्हायरल व्हिडिओवर लाईक्स, कमेंट करताना दिसत आहेत.

SSR | sakal

एका चाहत्यांनी कमेंटमध्ये लिहीलं आहे की, मला आधी वाटलं होतं की तो सुशांत आहे, दुसऱ्याने लिहिले - आमचा सुशांत परत आला आहे. तर दुसर्‍या चाहत्यांनी लिहिलं - या व्यक्तीच्या सर्व पोस्ट AI च्या मदतीने केल्या आहेत.

SSR | sakal

सुशांत सिंग राजपूतने आपल्या करियरची सुरुवात सर्वप्रथम 'पवित्र रिश्ता' या टीव्ही मालिकेद्वारे चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली त्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये पर्दापण केलं यामध्ये काई पो चे, शुद्ध देसी रोमान्स, छिछोरे,एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.

SSR | sakal

सुशांत सिंग राजपूत आज आपल्यात नसला तरी त्याच्या चाहत्यांच्या आठवणीत तो सदैव जिवंत आहे.

SSR | sakal

काही चाहते व्हायरल व्हिडिओवर लाईक्स, कमेंट करताना दिसत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियावर या त्याच्या फॉलोवर्समध्ये भर पडली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSR | sakal