IPL स्थगित! BCCI ला प्रत्येक सामन्यामागे झालं इतक्या कोटींचं नुकसान

Pranali Kodre

भारत - पाकिस्तान तणाव

भारत - पाकिस्तान देशात तणाव वाढत चालला आहे. अशात ८ मे रोजी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील धरमशाला येथे होणारा सामना १०.१ षटकानंतर रद्द करण्यात आला.

India vs Pakistan | Sakal

आयपीएल २०२५ स्थगित

त्यानंतर आयपीएल २०२५ स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. यामुळे खेळाडूही आपापल्या घरी परतले आहेत.

IPL 2025 | Sakal

उर्वरित सामने

आयपीएल २०२५ स्पर्धेतील अद्याप १६ सामने बाकी आहेत. यात प्लेऑफ आणि अंतिम सामन्याचाही समावेश आहे.

IPL 2025 | Sakal

आर्थिक नुकसान

आता आयपीएलमधील हे उर्वरित १६ सामने कधी आणि कुठे खेळवायचे याचा निर्णय होणे बाकी आहे. दरम्यान, आयपीएल स्थगित झाल्याने त्याचे आर्थिक नुकसानही मोठे आहे.

IPL 2025 | Sakal

बीसीसीआयला नुकासान

सध्या जे रिपोर्ट्स समोर आले आहेत, त्यानुसार प्रसारण हक्क, प्रायोजकत्व करार, तिकीट विक्री आणि सामन्याच्या कामकाजातून मिळणारे उत्पन्न, हे सर्वत गमावल्याने प्रत्येक स्थगित आयपीएल सामन्यामागे बोर्डाला सुमारे १०० ते १२५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

IPL 2025 | Sakal

विमा असला तरी...

जरी विमा मिळाला, तरी प्रत्येक सामन्यामागे ६० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.

IPL 2025 | Sakal

इतर व्यावसायांनाही नुकसान

बीसीसीआय आणि फ्रँचायझींव्यतिरिक्त आयपीएल स्थगित होण्याचे परिणाम माल विक्रेते, कॅब ड्रायव्हर आणि सामन्यावर अवलंबून असणाऱ्या स्थानिक आणि तात्काळ व्यवसायांवरही झाला आहे.

IPL 2025 | Sakal

१०० कसोटी, ३० शतके... विराटची कशी आहे कसोटी कारकिर्द?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli | Sakal
येथे क्लिक करा