भारतीय संघ यंदाही गाठणार WTC ची फायनल?

अनिरुद्ध संकपाळ

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका बरोबरीत सोडवली आहे. यामुळे भारत WTC पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहचला आहे.

भारतीय संघ 2024 मध्ये पाच कसोटी मालिका खेळणार आहे. यातील तीन कसोटी मालिका मायदेशात होणार आहे. त्यामुळे भारताला फायनल गाठण्याची चांगली संधी आहे.

भारतीय संघाने नुकतेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दोन कसोटी सामने खेळले आहेत. भारतीय संघ आता अफगाणिस्तान विरूद्ध 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळेल.

यानंतर मायदेशातच भारतीय संघ इंग्लंडसोबत 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. या कसोटी मालिकेनंतर आयपीएल आणि टी 20 वर्ल्डकप 2024 होणार आहे.

वर्ल्डकपनंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर तीन टी 20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळेल.

यानंतर मयादेशात बांगलादेशविरूद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका आणि 3 टी 20 सामन्यांची मालिका होईल.

न्यूझीलंडचा संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे.

या मालिकेनंतर वर्षाच्या शेवटी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल. या दौऱ्यावर 4 कसोटी सामने होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.