दिवाळीच्या सुट्टीत करा परदेशवारी, 'या' देशांमध्ये मिळेल व्हिसाशिवाय प्रवेश

Aishwarya Musale

आपण भारतीय व्हिसाशिवाय जाऊ शकतो, असे जगात 52 देश आहेत. त्यात एका देशाची भर पडली आहे. हा देश भारतीय नागरिकांना व्हिसाशिवाय येण्याचे आमंत्रण देत आहे.

भारतीयांसाठी ही योजना नोव्हेंबर 2023 पासून सुरू होत असून पुढील वर्षी मे पर्यंत चालेल.

पण हा कोणता देश आहे हे जाणून घेऊया...

थायलंड सरकारने भारतातून येणाऱ्या पर्यटकांसाठी व्हिसाची अट रद्द केली आहे.

एका सरकारी प्रवक्त्याने मंगळवारी सांगितले की, भारतीय पर्यटक नोव्हेंबर 2023 ते मे 2024 या कालावधीत व्हिसाशिवाय थायलंडला जाऊ शकतात.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.

थायलंडने सप्टेंबरमध्ये चीनी पर्यटकांसाठीही व्हिसाची अट काढून टाकली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.