आयएएस होण्याचे होते स्वप्न, फेस क्रीमच्या जाहिरातीने मिळाली प्रसिद्धी! जाणून घ्या यामी गौतमशी संबंधित न ऐकलेल्या गोष्टी

Anuradha Vipat

फिल्म इंडस्ट्रीतही वेगळी ओळख

यामी गौतमला आज परिचयाची गरज नाही. आपल्या मेहनत आणि क्षमतेच्या जोरावर तिने टीव्हीपासून बॉलिवूड आणि अगदी साऊथ फिल्म इंडस्ट्रीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

yami gautam birthday

35 वा वाढदिवस

कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसतानाही आज यामीचे नाव फिल्म इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. आज यामी तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे.

yami gautam birthday

आयएएस होण्याचा निर्णय

यामी गौतमचा जन्म 28 नोव्हेंबर 1988 रोजी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे झाला. तिचे पालनपोषण चंदीगड येथे झाले. या अभिनेत्रीने लॉ ऑनर्समध्ये ग्रॅज्युएशन करण्यासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तिने आयएएस होण्याचा निर्णय घेतला.

yami gautam birthday

करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून

दरम्यान, तिला अभिनयाची आवड निर्माण झाली आणि ती आपले शिक्षण सोडून मुंबईला गेली.यामी गौतमने पहिल्यांदा आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती.

yami gautam birthday

कन्नड चित्रपटात काम

यानंतर तिने 'चांद के पार चलो' या टीव्ही सीरियलमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर यामीने 'उल्लासा उत्साह' या कन्नड चित्रपटात काम केले.

yami gautam birthday

रातोरात स्टार बनवले

पण तिने बॉलीवूडमध्ये पोहोचण्यासाठी राकेश रोशनची फेस क्रीमची जाहिरात केली. या जाहिरातीने यामीला रातोरात स्टार बनवले आणि अभिनेत्रीने 'विकी डोनर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

yami gautam birthday

आदित्य धरशी लग्न

यामी गौतमने 4 जून 2021 रोजी चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

yami gautam birthday