वडील गेले, पक्ष गेला, चिन्ह ही गेलं पण तो लढला आणि हो जिंकला सुद्धा!

सकाळ डिजिटल टीम

माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे जगनमोहन हे पुत्र आहेत.

माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे निधन झाल्यानंतर जगनमोहन यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी १६ महिने तुरुंगात टाकले होते.

१६ महिने तुरंगात राहिल्या नंतर. तुरुंगातून जामिनावर सुटल्यावर काँग्रेसला धडा शिकविण्याचा चंगच त्यांनी बांधला होता. त्यांनी वायएसआर काँग्रेसने या पक्षाची स्थापना केली.

२०१४च्या विधानसभा निवडणूकीत जगनमोहन यांनी चांगली लढत दिली. पण भाजपशी हातमिळवणी केलेल्या चंद्राबाबू नायडू यांना सत्ता मिळाली.

विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘प्रजा संकल्प यात्रे’च्या माध्यमातून १४ महिन्यांत ३६४८ किमी अंतराची पदयात्रा काढून लोकांशी संवाद साधला.

त्यानंतर आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत १७५ पैकी १५० जागा जिंकून जगनमोहन रेड्डी यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले.

वायएसआर काँग्रेसने लोकसभेच्या २५ पैकी २२, तर विधानसभेच्या १७५ पैकी १५१ जागा जिंकल्या आहेत.

त्यानंतर जगनमोहन रेड्डी यांनी शपथविधी ३० मे रोजी विजयवाडा येथे इंदिरा गांधी महापालिका स्टेडियमवर झाला. आणि आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.