Sandip Kapde
ऑपरेशन सिंदूरनंतर तुर्कियेने पाकला पाठिंबा दिला आणि भारताविरुद्ध वापरले जाणारे ड्रोनची सुद्धा मदत केली.
भूकंपानंतर भारताने तुर्कियेला मदत केली, तरीही त्यांनी अशी भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकेकाळी याच तुर्कांनी भारतात राज्य केले होते.
187 ई.पू. मौर्य साम्राज्याच्या आक्रमनानंतर भारतात अस्थिरता निर्माण झाली आणि तुर्क आक्रमकांनी संधी साधून सत्ता मिळवली.
187 ई.पू. मौर्य साम्राज्याच्या পতनानंतर भारतात अस्थिरता निर्माण झाली आणि तुर्क आक्रमकांनी संधी साधून सत्ता मिळवली
गजनीच्या तुर्क सरदार महमूद गजनवीने 1001 ते 1026 दरम्यान भारतावर 17 वेळा हल्ले केले आणि येथील संपत्ती लुटली, तसेच अनेकांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले.
मुहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहानला हरवल्यानंतर त्याचा गुलाम कुतुबुद्दीन ऐबक याला भारतात सत्ता दिली.
1206 मध्ये ऐबकने गुलाम वंशाची स्थापना केली, जो पुढे दिल्ली सल्तनत म्हणून ओळखला गेला.
गुलाम वंशात इल्तुतमिश, रजिया सुलतान, बलबन यांसारखे महत्त्वाचे तुर्क शासक होऊन गेले. 1290 पर्यंत दिल्लीवर त्यांचे राज्य होते.
1290 मध्ये जलालुद्दीन खिलजीने गुलाम वंशाचा अंत करून खिलजी वंशाची स्थापना केली. खिलजी मूळचे तुर्क असले तरी अफगाणिस्तानात स्थायिक झाले होते.
अलाउद्दीन खिलजीने दक्षिणेपर्यंत साम्राज्य विस्तारले. त्यानंतर शिहाबुद्दीन आणि मुबारक खिलजी यांनी दिल्लीवर राज्य केले.
1320 मध्ये गयासुद्दीन तुगलकने खिलजी वंशाचा शेवट करून तुगलक वंशाची स्थापना केली. मुहम्मद बिन तुगलक आणि फिरोजशाह तुगलक हे त्याचे प्रमुख वारसदार होते.
तुगलक वंशानंतर दिल्लीवर सैयद वंश (1414) आणि लोदी वंश (1451) आले. लोदी हे अफगाण वंशाचे होते. अशा प्रकारे सुमारे 250 वर्षे तुर्क शासकांनी भारतावर राज्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.