David Warner : वॉर्नरला SCG प्रेक्षकांनी दिला खास निरोप

अनिरुद्ध संकपाळ

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आज होम ग्राऊंड सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आपला शेवटचा कसोटी सामना खेळला.

या सामन्यापूर्वीच त्याची हरवलेली ग्रीन बॅगी कॅप मिळाली. वॉर्नर तीच कॅप घालून शेवटच्या दिवशी मैदनावर उतरला.

सामन्यानंतर वॉर्नरने पत्नीला मिठी मारली. त्याच्या पत्नीने कारकिर्दीतील सर्व चढ उतारांवर त्याला साथ दिली.

पाकिस्तान संघाने निवृत्त होणाऱ्या वॉर्नरला संपूर्ण संघाने स्वाक्षरी केलेला बाबर आझमचा टी शर्ट भेट म्हणून दिला.

वॉर्नर फेअरवेलच्या वेळी उस्मान ख्वाजाच्या आईला देखील भेटला. ख्वाजा आणि वॉर्नर सहा वर्षापासूनचे मित्र आणि सहकारी आहेत. वॉर्नर ख्वाजाच्या आईचा फेव्हरेट क्रिकेटर आहे.

याचबरोबर डेव्हिड वॉर्नरच्या फेअरवेलच्यावेळी सिडनी क्रिक्रेट ग्राऊंडमधील स्टँडमध्ये बसलेल्या सर्व प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.