वाढत्या चरबीमुळे त्रस्त आहात? मग, आजपासून आहारात 'या' ज्यूसचा करा समावेश

Monika Lonkar –Kumbhar

बिघडलेली जीवनशैली

सध्याचे धकाधकीचे जीवन, बिघडलेला आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. 

Juice For Weight Loss

लठ्ठपणा

या समस्यांमध्ये लठ्ठपणाचा समावेश आहे. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वजण या वाढत्या वजनामुळे त्रस्त झाले आहेत.

Juice For Weight Loss

लठ्ठपणा वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात. मात्र, आजकाल फास्टफूडचे वाढलेले सेवन आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे वजन मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

Juice For Weight Loss

डाळिंबाचा ज्यूस

डाळिंब हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर फळ मानले जाते. डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात लोह, खनिज, फायबर, जस्त आणि पोटॅशिअम असते. हे सर्व पोषकघटक आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा देतात आणि वजन कमी करण्यास मदत देखील करतात. 

Juice For Weight Loss

तुमच्या शरीरातील वाढती चरबी कमी करण्यासाठी तुम्ही डाळिंबाच्या ज्यूसचे सेवन करू शकता.

Juice For Weight Loss

टोमॅटो ज्यूस

टोमॅटोचा वापर आपण अनेक खाद्यपदार्थांमध्ये करतो. मात्र, तुम्ही जर टोमॅटोचा ज्यूस जर प्यायलात तर याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. जर तुम्हाला शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करायची असेल आणि वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात टोमॅटोचा ज्यूसचा अवश्य समावेश करा.

Juice For Weight Loss

बीटाचा ज्यूस

पोषकघटकांनी परिपूर्ण असलेले बीट आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. बीटाचा ज्यूस प्यायल्याने आपल्या शरीराची चयापचय क्रिया वाढते आणि पोटाभोवती जमा झालेली चरबी दूर करण्यास मदत होते.

Juice For Weight Loss

वजन कमी करायचे आहे? मग, आहारात समाविष्ट करा 'हे' झीरो कॅलरिज फूड्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

zero calorie foods | esakal