काळ्या रंगाच्या साडीत खुलले सौंदर्य

ऋषिकेश साळवी

कियारा अडवाणी

अष्टपैलुत्वाची राणी कियारा अडवाणी हिने तिची साधी पण मोहक काळी साडी, गोड नेकलाइन लो कट ब्लाउजसह स्टाईल केली. लूक पूर्ण करण्यासाठी तिने हिरवे मणी आणि लहान बिंदीसह पारंपरिक सोन्याचा नेकलेस जोडला.

कियारा अडवाणी | Sakal

दीपिका पदुकोण

आपल्या अभिनयाच्या जोरावर दीपिकाने बऱ्याच वेळा चाहत्यांचे मन जिंकले आहे; परंतु या सोनेरी बॉर्डर असलेल्या काळ्या रंगाच्या साडीत तर तिचे सौंदर्य अजूनच खुलून दिसले आहे. यावर तिने सोन्याचे कानातले घातले आहे, जे तिच्या लूकवर अधिकच सुंदर दिसत आहे. एकूणच पुन्हा एकदा दीपिकाने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

दीपिका पदुकोण | Sakal

विद्या बालन

विद्या बालनबद्दल बोलायचे झाले तर ती अनेकदा काळ्या साडीत दिसते. सिल्कपासून कॉटनपर्यंतच्या काळ्या साड्या परिधान करून ती प्रत्येकासमोर स्टायलिश लूक सादर करत असते. या लुकमध्येसुद्धा विद्या बालन अतिशय सुंदर दिसत आहे.

विद्या बालन | Sakal

जान्हवी कपूर

खरोखरच साडी ही स्त्रीमधील खरे सौंदर्य प्रकट करते. काळी साडी व काळ्या बिंदीमधील जान्हवी कपूरचा लूक पाहण्यासारखा आहे. सुशोभित फूल स्लीव्हज ब्लाऊज आणि चमकणारा ब्राँझ मेकअपमध्ये ती इतकी सुंदर दिसत आहे की, तिच्याकडून नजर हटवणे फार कठीण आहे.क्रिती सेनॉन

जान्हवी कपूर | Sakal

क्रिती सेनॉनक्रिती सेनॉन

काळी साडी आणि चमकणाऱ्या गोल्डन ब्लाऊजमध्ये क्रिती अजूनच सुंदर दिसत आहे. सोबतच तिच्या लुकला साजेसा नेकलेस आणि इयररिंग वेअर केले आहेत, जे तिच्या लुकला चार चाँद लावत आहेत. यावर तिने सटल मेकअप करून लुक पूर्ण केला आहे.

क्रिती सेनॉन | Sakal

डायना पेंटी

सिल्व्हर ओव्हर ब्लॅक लूक निवडताना, डायना तिच्या फुल स्लीव्हज ब्लाऊजमध्ये पँटी ट्विस्टसह अतिशय सुंदर दिसत आहे. त्यात कॉलर आणि टाय होते जे तिच्या लुकमध्ये वेगळे होते. तिने स्टेटमेंट डायमंड ज्वेलरीसह तिचा लुक केला आणि तिचे लाल ओठ केकच्या वरच्या चेरीसारखे दिसत होते! या लुकने तिने खरंच चाहत्यांना भुरळ घातली आहे.

डायना पेंटी | Sakal

परिणिती चोप्रा

चित्रपटांपासून ते वास्तविक जीवनापर्यंत परिणिती साडीत आपली स्टाईल दाखवत असते. तिने अलीकडे ट्रेंडी पद्धतीने काळी साडी नेसली, या साडीत तिचे सौंदर्य अजूनच खुलून दिसत आहे. ही साडी तुम्हीही कॅरी करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परिणिती चोप्रा | Sakal