आरोग्यासाठी लाभदायी आहेत वांगी, जाणून घ्या 'हे' आश्चर्यकारक फायदे

Monika Lonkar –Kumbhar

वांगी

वांगी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. वांग्यामध्ये पोषकघटकांचे प्रमाण भरपूर आढळून येते. व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि खनिजांनी समृद्ध असलेली वांगी आपल्या आहारात असायलाच हवीत.

benefits of brinjal

साखरेची पातळी नियंत्रित राहते

वांग्यामध्ये फायबर्सचे प्रमाण भरपूर आढळून येते. फायबर हे आपल्या रक्तातील साखरेचे पचन आणि शोषणाचा वेग कमी करण्याचे काम करते. त्यामुळे, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

benefits of brinjal

हृदयासाठी फायदेशीर

वांग्यामध्ये असलेले फायबर्स कॉलेस्ट्रॉलची पातळी आणि रक्तदाब कमी करण्याचे काम करते. त्यामुळे, वांगी खाणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. र

benefits of brinjal

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशा लोकांनी वांग्याचा आहारात जरूर समावेश करावा. वांग्यामध्ये आढळून येणाऱ्या व्हिटॅमीन सी मुळे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहण्यास मदत होते.

benefits of brinjal

वजन कमी होते

वांग्यामध्ये फॅट्स आणि कॅलरीजचे प्रमाण कमी आढळून येते. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी वांग्यांचा आहारात समावेश असणे महत्वाचे आहे.

benefits of brinjal

पचनक्षमता

वांग्याचे सेवन केल्याने पचनक्षमता सुधारण्यास मदत होते. ज्यांना पचनाची समस्या आहे, अशा लोकांनी आहारात वांग्यांचा जरूर समावेश करावा.

benefits of brinjal

मानसिक आरोग्यासाठी उत्तम

मानसिक आरोग्यासाठी व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शिअम, झिंक आणि फोलेट फायदेशीर मानले जाते. वांग्यामध्ये हे सर्व घटक मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे, मानसिक आरोग्यासाठी वांग्यांचा आहारात समावेश असणे फायदेशीर मानले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits of brinjal