हिवाळ्यात भरपूर फरसबी खा आणि हेल्दी रहा..!

Monika Lonkar –Kumbhar

संतुलित आहार

निरोगी जीवनशैलीसाठी योग्य आहार आणि व्यायाम यांची जोड असणे अतिशय महत्वाचे आहे. आहारामध्ये आपण काय खातो? आणि किती प्रमाणात खातो? याला फार महत्व आहे.

Green Beans Benefits

फरसबी

फरसबीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये फरसबीचा आवर्जून वापर केला जातो. ज्यामुळे, पदार्थाची चव आणखी वाढते.

Green Beans Benefits

पचनसंस्था

फरसबीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्सचा समावेश आढळून येतो. त्यामुळ, फरसबीचे सेवन केल्याने आपली पचनसंस्था संतुलित आणि निरोगी राहण्यास मदत होते. फरसबीचे सेवन केल्याने पोटाच्या इतर समस्या दूर होतात.

Green Beans Benefits

हाडांना मिळते बळकटी

फायबर्स, व्हिटॅमिन्स आणि कॅल्शिअमचा समृद्ध स्त्रोत फरसबीमध्ये आढळून येतो. त्यामुळे, फरसबीमधील या पोषकघटकांमुळे आपल्या शरीराची हाडे मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते.

Green Beans Benefits

हृदयासाठी फायदेशीर

फरसबीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्सचा समावेश आढळून येते. हे फायबर्स आपल्या शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करते त्यामुळे, हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

Green Beans Benefits

डिप्रेशन नियंत्रित राहते

डिप्रेशनची समस्या दूर करण्यासाठी फरसबी फायदेशीर आहे. यामध्ये आढळून येणाऱ्या पोषकघटकांमुळे मूड देखील चांगला राहतो.

Green Beans Benefits

अ‍ॅनिमियामध्ये प्रभावी

फरसबीमध्ये आढळून येणाऱ्या पोषकघटकांमध्ये लोहाचे ही विपुल प्रमाण आढळून येते. लोह हा आपल्या शरीरातील रक्तपेशींचा एक महत्वाचा आणि अत्यावश्यक भाग आहे. या लोहामुळे शरीरातील इतर सर्व पेशींमध्ये ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत होते. त्यामुळे, अ‍ॅनिमियाची समस्या दूर करण्यासाठी फरसबी प्रभावी आहे.

Green Beans Benefits

हिवाळ्यातील सुपरफूड आहे ब्रोकोली, जाणून घ्या फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Benefits of Broccoli | esakal