अयोध्येला गेल्यावर 'या' स्ट्रीट फूड्सचा आस्वाद नक्की घ्या

Monika Lonkar –Kumbhar

अयोध्या

अयोध्येमध्ये मागील काही दिवसांपासून प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापणेची जय्यत तयारी सुरू आहे. अयोध्येमध्ये २२ जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची नवीन मंदिरात प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. 

Street Food in Ayodhya

रामलल्ला

रामलल्लाच्या ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. त्या मूर्तीचे संपूर्ण छायाचित्र नुकतेच समोर आले आहे.

Street Food in Ayodhya

स्ट्रीटफूड

अयोध्या नगरी ही केवळ राम मंदिरासाठी प्रसिद्ध नाही तर येथील खाद्यपदार्थांसाठी देखील प्रसिद्ध आहे. एकदा जर तुम्ही येथील खाद्यपदार्थांची चव चाखली तर ही चव तुम्ही कधीच विसरणार नाही. मग, ते चाट असो किंवा जिलेबी.

Street Food in Ayodhya

दाल कचोरी

दाल कचोरी आणि पूरी हा अयोध्येतील लोकांचा सकाळचा आवडता नाश्ता आहे. या दाल कचोरीमध्ये विविध प्रकारच्या भाज्या आणि कडधान्यांचा समावेश असतो. अयोध्येमध्ये मूग आणि उडीद डाळ यांच्यापासून बनवलेली कचोरी खूप प्रसिद्ध आहे. ही कचोरी चटणी किंवा भाजीसोबत खाल्ली जाते. 

Street Food in Ayodhya

चाट

अयोध्येतील चाटची देखील खासियत आहे. ही खासियत म्हणजे अयोध्येमध्ये मिळणाऱ्या चाटसोबत गोड-आंबट चटणी, मसालेदार चणे, कोथिंबीर आणि इतर मसाल्यांचा वापर केला जातो. यामुळे, चाटची चव देखील वाढते.

Street Food in Ayodhya

रबडी

ज्या लोकांना गोड खायला आवडते. त्यांच्यासाठी अयोध्येमध्ये गोड पदार्थांचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. अयोध्येतील स्पेशल रबडी सुप्रसिद्ध असून या रबडीमध्ये विविध प्रकारच्या ड्रायफ्रूट्सचा आणि केशरचा वापर केला जातो. त्यामुळे, या रबडीची चव खास असते. अयोध्येत गेल्यावर ही रबडी चाखायला विसरू नका.

Street Food in Ayodhya

दही भल्ले

अयोध्येत गेल्यावर येथील दही भल्ले खायला अजिबात विसरू नका. या दही भल्ल्यांची चव इतकी अप्रतिम आहे की, तुम्ही या दही भल्ल्यांची चव विसरूच शकणार नाही. हे दही भल्ले डाळींपासून बनवले जातात.

Street Food in Ayodhya

लक्षद्वीपमध्ये फिरायला गेल्यावर या स्ट्रीट फूड्सचा आस्वाद घ्यायला विसरू नका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Street Food in Lakshadweep