आरोग्यासाठी लाभदायी आहे ब्राऊन राईस,जाणून घ्या 'हे' फायदे

Monika Lonkar –Kumbhar

आहार

निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहार अतिशय आवश्यक आहे.

Brown Rice Benefits

आहारासोबतच व्यायाम देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आहार आणि व्यायामाची योग्य प्रकारे सांगड घातली तर तुम्ही हेल्दी आणि फिट रहाल.

Brown Rice Benefits

ब्राऊन राईस

पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राईसवर जास्त प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे, या तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश असतो.

Brown Rice Benefits

वजन कमी करण्यासाठी लाभदायी

ब्राऊन राईसमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. त्यामुळे, या ब्राऊन राईसचे सेवन केल्यानंतर आपले पोट बराच काळ भरलेले राहते आणि फार भूक ही लागत नाही.

Brown Rice Benefits

ग्लूटेन फ्री

ग्लूटेन मुक्त आहारासाठी ब्राऊन राईस हा एक उत्तम पर्याय आहे.

Brown Rice Benefits

हृदयासाठी फायदेशीर

ब्राऊन राईसमध्ये फायबर्स आणि मॅग्नेशिअमचे भरपूर प्रमाण आढळून येते. या दोन्ही घटकांमुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

Brown Rice Benefits

मधुमेहींसाठी लाभदायी

पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राईस हा पचायला हलका असतो. त्यामुळे, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. ब्राऊन राईसच्या सेवनामुळे टाईप-२ मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.

Brown Rice Benefits

हिवाळ्यातील सुपरफूड आहे बाजरी, जाणून घ्या 'हे' आरोग्यदायी फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brown Rice Benefits