लाल सफरचंदापेक्षा फायदेशीर आहे हिरवे सफरचंद, जाणून घ्या फायदे

Monika Lonkar –Kumbhar

हिरवे सफरचंद

आजकाल मार्केटमध्ये लाल सफरचंदाप्रमाणे हिरवे सफरचंद ही मिळते. लाल सफरचंदाप्रमाणे या हिरव्या सफरचंदाचे आरोग्याला अनेक फायदे आहेत.

benefits of green apple

पौष्टिक गुणधर्म

हिरव्या सफरचंदामध्ये पौष्टिक गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे, या सफरचंदाचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायेशीर आहे.

benefits of green apple

हृदयासाठी फायदेशीर

काही संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, जे लोक नियमितपणे हिरव्या सफरचंदाचे सेवन करतात, त्यांच्यात हृदयविकाराच्या लक्षणांचे कमी प्रमाण आढळून आले आहे.

benefits of green apple

वजन नियंत्रणात राहते

हिरव्या सफरचंदाचे सेवन केल्यानंतर बराच काळ आपले पोट भरलेले राहते. शिवाय, फार काळ भूक लागत नाही. त्यामुळे, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

benefits of green apple

मधुमेहाचा धोका कमी होतो

जे लोक नियमितपणे हिरव्या सफरचंदाचे सेवन करतात, त्यांना 'टाइप २' मधुमेहाचा धोका कमी असल्याचे आढळून आले आहे. 

benefits of green apple

कॅन्सरपासून बचाव होतो

काही शास्त्रज्ञांच्या मते हिरव्या सफरचंदात आढळणारे अँटीऑक्सिडंट्स आणि त्यातील अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात.

benefits of green apple

डोळ्यांसाठी फायदेशीर

हिरव्या सफरचंदामध्ये लाल सफरचंदापेक्षा जास्त प्रमाणात 'व्हिटॅमिन ए' आढळून येते. हे व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

benefits of green apple

चेहऱ्यावर हवा आहे गुलाबी ग्लो?मग, सफरचंदापासून बनवा 'हे' फेसपॅक्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apple Face Packs