कोल्डड्रिंक्सचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक

Monika Lonkar –Kumbhar

कोल्डड्रिंक्स आरोग्यासाठी हानिकारक

कोणतेही फंक्शन असुद्या किंवा छोटीशी पार्टी प्रत्येक ठिकाणी कोल्डड्रिंक्सचा पर्याय हमखास ठेवला जातो. मात्र, कोल्डड्रिंक्सचे अतिसेवन करणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

cold drinks

पोटाची चरबी वाढते

कोल्डड्रिंक्सचे अतिसेवन केल्यामुळे पोटाची चरबी वाढते. या वाढलेल्या चरबीमुळे वजन आपोआप वाढते.

cold drinks

मधुमेहाचा धोका

कोल्डड्रिंक्स आणि सॉफ्ट ड्रिंक्समध्ये साखरेचे भरपूर प्रमाण असते. त्यामुळे, जेव्हा या गोष्टींचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते, तेव्हा शरीरातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे, मधुमेहाचा धोका निर्माण होतो.

cold drinks

हृदयविकार

कोल्डड्रिंक्सचे अतिसेवन केल्याने मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका संभवतो. त्यामुळे, हा धोका टाळण्यासाठी कोल्डड्रिंक्सचे जास्त सेवन करणे टाळा.

cold drinks

दातांसाठी हानिकारक

कोल्डड्रिंक्स आणि सॉफ्टड्रिंक्समध्ये असलेल्या फॉस्फोरिक आणि कार्बोनिक अ‍ॅसिड आपल्या दातांसाठी अतिशय घातक आहे. कोल्डड्रिंक्सचे अतिसेवन केल्याने दातांवरील इनॅमल निघून जाते.

cold drinks

पोटाच्या समस्या वाढतात

कोल्डड्रिंक्स आणि सॉफ्टड्रिंक्समध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण आढळून येते. त्यामुळे, जेव्हा तुम्ही कोल्डड्रिंक्सचे अतिसेवन करता, तेव्हा पोटात गॅस तयार होतो आणि अपचनाची समस्या निर्माण होते.

cold drinks

किडनीवर होतो परिणाम

कोल्डड्रिंक्स आणि सॉफ्टड्रिंक्समध्ये असलेल्या साखरेमुळे केवळ मधुमेहाची समस्या निर्माण होत नाही तर याचा वाईट परिणाम किडनीवर देखील होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cold drinks