'या' चुकीच्या सवयींमुळे वाढते पाठदुखीची समस्या, वेळीच द्या लक्ष

Monika Lonkar –Kumbhar

चुकीच्या सवयी

आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही सवयी या अनेक समस्यांचे कारण बनू शकतात. 

Back Pain

या समस्यांमध्ये पाठदुखी, खांदेदुखी, मानेमध्ये वेदना होणे इत्यादी समस्यांचा समावेश आहे.

Back Pain

या सवयींमध्ये चुकीच्या पद्धतीने वाकून काहीतरी उचलणे, झोपण्याची स्थिती, व्यायाम न करणे इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश होतो. जर तुम्ही वेळीच या गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर या समस्या आणखी गंभीर होऊ शकतात.

Back Pain

मोबाईलचा जास्त वापर करणे

मोबाईलचा जास्त वापर केल्याने पाठदुखी, खांदेदुखी आणि मानेमध्ये वेदना होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. अनेकदा आपण मोबाईलवर बोलण्यात किंवा मोबाईल पाहण्यात इतके व्यस्त होतो की आपण कोणत्या स्थितीमध्ये बसलो आहोत? याकडे आपले लक्ष जात नाही.

Back Pain

फोनमध्ये जास्त वेळ पाहताना सतत मान वाकवणे, सरळ बसण्याऐवजी झोपणे इत्यादी सवयी तुमच्या मणक्याच्या आरोग्यासाठी अजिबात चांगल्या नाहीत. मोबाईलच्या या सवयीमुळे पाठदुखी, खांदेदुखी आणि मानेमध्ये वेदना होण्याचे प्रमाण आणखी वाढते.

Back Pain

धूम्रपान करणे

जर तुम्ही तंबाखू खात असाल किंवा स्मोकिंग करत असाल तर तर वेळीच ही धूम्रपानाची सवय थांबवा. कारण, धूम्रमान केल्याने तुम्हाला पाठ आणि कंबरदुखीचा धोका हा धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात वाढतो.

Back Pain

खांद्यावर जास्त भार घेणे

काही लोक ऑफिसच्या बॅगमध्ये भरपूर सामान घेऊन प्रवास करतात. प्रवास करताना ही ऑफिसची बॅग खांद्यावर घेतली जाते. त्यामुळे, बॅगेतील सामानाचा सर्व भार खांद्यावर घेतला जातो. एवढा भार खांद्यावर घेऊन प्रवास करणे किंवा चालणे हे मणक्याच्या आरोग्यासाठी चांगले नाही.

Back Pain

हाडांच्या बळकटीसाठी फायदेशीर आहे किवी, आजच करा आहारात समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits of kiwi | esakal