Foods Never Expire : जेवण बनवताना वापरल्या जाणाऱ्या ‘या’ पदार्थांना नसते एक्सपायरी डेट

सकाळ डिजिटल टीम

जेवण बनवताना नेहमी महिला वर्गाला वस्तुंच्या एक्सपायरी डेटची चिंता असते.

पण स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या काही वस्तुंना एक्सपायरी डेट नसते.

व्हिनेगरचा वापर अनेक प्रकारे केला जातो. ते लवकर खराब होत नाही. त्यामुळे एक्सपायरी डेटनंतरही व्हिनेगर वापरता येते.

साखर दीर्घकाळ वापरता येते. साखर एअर टाईट डब्यात व्यवस्थित साठवली तर ती वर्षानुवर्षे टिकते.

मध एअर टाईट डब्यात व्यवस्थित साठवावा लागतो. मधामध्ये आम्लयुक्त पीएच कमी असतो, त्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया वाढत नाहीत आणि तो दीर्घकाळ टिकतो.

पास्ता हवाबंद डब्यात व्यवस्थित ठेवला तर तो वर्षानुवर्षे टिकु शकतो.

साधे पांढरे मीठ असो किंवा सैंधव, कोणत्याही प्रकारचे मीठ नीट स्टोअर करून ठेवल्यास बऱ्याच काळापर्यंत खराब होत नाही.

एक्स्पायरी डेटनंतरही तुम्ही कॉफी वापरू शकता. कारण प्री ब्रूड कॉफीचे एक मिश्रण सुकवून त्यापासूनच इन्स्टंट कॉफी बनवली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.