Use & Throw चे कप वापरताय? थांबा आधी हे दुष्परिणाम वाचा

Aishwarya Musale

प्लास्टिक कप

जर तुम्हालाही बाहेर खाण्या-पिण्याची आवड असेल तर तुम्ही पेपर किंवा प्लास्टिकच्या कपमधूही पदार्थांचे सेवन केले असेलच.

cup | sakal

पेपर कप्स

कॅफे असो किंवा कोणताही स्टॉल बऱ्याच ठिकाणी पेपर कप्सचा वापर केला जातोच. त्यामध्ये द्रव पदार्थ पिणे सोपं असतं, त्यामुळे त्याचा दररोज मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

cup | sakal

प्लास्टिक कपमध्ये चहा पिणं नुकसानकारक असतं का?

प्लॅस्टिकच्या कपमध्ये चहा किंवा कोणतेही गरम पेय प्यायल्याने प्लास्टिकचे कण त्यात विरघळू लागतात.

cup | sakal

हानिकारक रसायन

काही प्लास्टिकचे कप बिस्फेनॉल A (BPA) सारख्या हानिकारक रसायनांचा वापर करून तयार केले जातात, जे पेयांमध्ये वितळतात आणि थेट शरीरात जाऊ शकतात.

cup | sakal

शरीर

Bisphenol A (BPA) याचा शरीरात प्रवेश झाल्यास आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे शरीराच्या अनेक भागांवर विपरीत परिणाम दिसून येतात.

cup | sakal

पेपर कपमध्ये चहा पिणं नुकसानकारक असतं का?

प्लास्टिकमुळे होणारी हानी टाळण्यासाठी बहुतेक लोक पेपर कप वापरतात. पण पेपर कप वापरणेही आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

cup | sakal

गरम पेय

पेपर कप तयार करण्यासाठी, प्लास्टिक किंवा मेणाचे कोटिंग केले जाते. या पेपर कपमध्ये गरम पेय किंवा पदार्थ टाकल्यास त्यामध्ये रसायने मिसळू शकतात.

cup | sakal

विषारी पदार्थ

त्यामुळे याच्या सेवनाने हे विषारी पदार्थ थेट शरीरात जाऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cup | sakal