हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी बनवा 'हे' होममेड फेस सीरम्स

Monika Lonkar –Kumbhar

हिवाळ्यात घ्या त्वचेची काळजी

थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच त्वचेची देखील काळजी घ्यावी लागते. या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी आणि रूक्ष होण्याचा धोका असतो.

face serum

फेस सीरम

फेस सीरममुळे पिंपल्स, चेहऱ्यावरील डाग आणि धूलिकण काढून टाकण्यास मदत होते. शिवाय, त्वचा हायड्रेटेड राहते. त्यामुळे, हिवाळ्यात देखील तुमच्या स्किनकेअर रूटीनमध्ये सीरमचा अवश्य समावेश करा.

face serum

ब्रायटनिंग सीरम

ब्रायटनिंग सीरम हे त्वचेवर उजळपणा देण्यास मदत करते. हे फेस सीरम बनवण्यासाठी १ चमचा गुलाबाचे तेल, २-३ चमचे कडुलिंबाचे तेल आणि व्हिटॅमिन सी पावडर १ चमचा (पाण्यात विरघळलेली) घ्या.

face serum

सीरम ड्रॉपर बॉटल

आता, हे वरील साहित्य एका काचेच्या ड्रॉपर बॉटलमध्ये एकत्रितपणे मिसळा. तुमचे फेस सीरम तयार आहे. चेहऱ्यावर मॉईश्चरायझर लावण्यापूर्वी हे फेस सीरम अवश्य लावा

face serum

हायड्रेटिंग फेस सीरम

हिवाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवावे लागते. हे हायड्रेटिंग सीरम कोरड्या त्वचेसाठी आणि इतर त्वचा प्रकारांसाठी अतिशय लाभदायी आहे.

face serum

कोरफड जेल

हे हायड्रेटिंग फेस सीरम बनवण्यासाठी १  चमचा कोरफड जेल, १ चमचा ग्लिसरीन आणि गुलाबतेलाचे ३-४ थेंब घ्या.

face serum

हायड्रेटिंग सीरम असे बनवा

वरील सर्व साहित्य एका डार्क रंगाच्या ड्रॉपर बॉटलमध्ये एकत्रितपणे मिसळा. या सीरमचा वापर करण्यापूर्वी चेहरा छान स्वच्छ करा. त्यानंतर, या फेस सीरमचे ३-४ थेंब चेहऱ्यावर लावून छान मसाज करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

face serum