केसांमध्ये वारंवार फाटे फुटतात? मग, 'या' होममेड हेअर मास्कची घ्या मदत

Monika Lonkar –Kumbhar

हिवाळा

हिवाळ्यात वातावरणात बदल झाले की, आपण आरोग्याची आणि त्वचेची खास काळजी घेतो.

Hair Mask

केसांच्या समस्या

हिवाळ्यात वातावरणाचा परिणाम हा केसांवर झाल्यामुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. केस कोरडे होणे, केसांना फाटे फुटणे, फ्रिझी केस होणे इत्यादी समस्या निर्माण होतात.

Hair Mask

कोरफड हेअर मास्क

कोरफडमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. या पोषकघटकांमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि बी१२ चा समावेश आढळून येतो. त्यामुळे, कोरफड ही आपल्या आरोग्यासाठी त्वचेसाठी, केसांसाठी आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

Hair Mask

दही

कोरफडचा हेअर मास्क बनवण्यासाठी दह्याचा अवश्य वापर करा. कोरफड हेअर मास्क बनवण्यासाठी १ वाटी कोरफड जेल घ्या. या जेलमध्ये ३-४ चमचे दही मिसळा. तुमचा हेअर मास्क तयार आहे. हा हेअर मास्क आता केसांवर अर्ध्या तासासाठी लावा. त्यानंतर, केस स्वच्छ पाण्याने धुवा.

Hair Mask

केसांना येते चमक

कोरफडीचा हेअर मास्क केसांना लावल्यामुळे केसांमध्ये फाटे फुटण्याची समस्या दूर होण्यास मदत होते, तसेच केसांना छान चमक येते.

Hair Mask

मेथी दाणे

मेथी दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्वांचा समावेश आढळून येतो. हे मेथी दाणे आपण अनेकदा स्वयंपाकघरात देखील वापरतो. अनेक रेसिपीजमध्ये मेथी दाण्यांचा वापर केला जातो.

Hair Mask

मेथी दाण्यांचा हेअर मास्क

मेथीच्या दाण्यांचा हेअर मास्क बनवण्यासाठी मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर, सकाळी उठल्यावर त्याची मिक्सरला बारीक पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये मध मिसळा तुमचा हेअर मास्क तयार आहे. हा हेअर मास्क केसांवर २५-३० मिनिटांसाठी लावा. त्यानंतर, केस धुवून टाका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hair Mask