Monika Lonkar –Kumbhar
थंडीमध्ये आणि पावसाळ्यात कोरड्या त्वचेची खास काळजी घ्यावी लागते. कोरड्या त्वचेमुळे चेहऱ्यावर पुरळ येणे, त्वचा कोरडी किंवा रूक्ष होणे, त्वचेवर खाज येणे अशा समस्या निर्माण होतात.
थंडीतील कोरड्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्ही कोरफड आणि काकडीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावू शकता.
कोरफडीमध्ये भरपूर पाणी असते. त्यामुळे, कोरफड ही आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी फार महत्वाची आहे. त्वचेला मॉईश्चराईझ करण्यासाठी आणि हायड्रेटेड ठेवण्याचे काम कोरफड करते.
काकडीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी असते. त्यामुळे, काकडी देखील आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरते. त्वचेला मॉईश्चराईझ करण्यासाठी आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी काकडी अतिशय लाभदायी आहे.
कोरफड आणि काकडीचा फेसपॅक बनवण्यासाठी एक काकडी किसून घ्या. त्यामध्ये, एक चमचा कोरफड जेल मिक्स करा, आता तुमचा फेसपॅक तयार आहे. हा फेसपॅक चेहऱ्यावर १५-२० मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून टाका.
कोरफड आणि काकडीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहरा सॉफ्ट होतो आणि चेहऱ्यावर ग्लो येतो.
कोरड्या त्वचेसाठी फेसपॅक करायला जर तुम्हाला वेळ मिळाला नाही तर त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही रोज रात्री झोपताना कोरफड जेल चेहऱ्यावर लावू शकता. त्यानंतर, सकाळी उठल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.