मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी 'हे' खाद्यपदार्थ आहेत फायदेशीर

Monika Lonkar –Kumbhar

आहार

तुम्ही जो आहार घेता त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि आनंदावर होतो, असे म्हटले जाते. 

Mental Health

आहारामध्ये एवढी ताकद असते की, याचा आपल्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. 

Mental Health

मानसिक आरोग्य

आपल्या दैनंदिन जीवनातील आहार हा आपल्या शारिरीक आरोग्यासोबतच आपले मानसिक आरोग्य देखील सुधारू शकतो. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही आहारात काही खाद्यपदार्थांचा नक्कीच समावेश करू शकता. या खाद्यपदार्थांमुळे तुमचा मूड सुधारण्यास मदत होऊ शकते. 

Mental Health

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट खायला तर सर्वांनाच आवडते. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का की, डार्क चॉकलेटमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. हे अँटीऑक्सिडंट्स तुमचा मूड सुधारण्यास मदत करू शकतात.

Mental Health

या अँटीऑक्सिडंट्समध्ये मूड सुधारण्याची क्षमता असते. त्यामुळे, आपले मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

Mental Health

अ‍ॅवोकॅडोज

अ‍ॅवोकॅडोजमध्ये व्हिटॅमिन बी ३ आणि ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, आपल्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी अ‍ॅवोकॅडोज अतिशय फायदेशीर आहे.

Mental Health

बदाम

बदाममध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन-ई, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम या घटकांचे प्रमाण जास्त असते. हृदयविकारासाठी आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी बदाम खाणे फायदेशीर ठरते. रोज मूठभर बदाम खाल्ल्यामुळे मूड सुधारण्यास मदत होऊ शकते.

Mental Health

मशरूम्स

व्हिटॅमीन डी ने समृद्ध असलेले मशरूम्स आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. मशरूम्समुळे हाडांचे आरोग्य मजबूत राहण्यास मदत होते. मशरूम्सचे सेवन केल्याने शरीरातील हॅपी हार्मोन्समध्ये देखील वाढ होते.

Mental Health

वजन कमी करण्यासाठी लाभदायी आहे मखाना, जाणून घ्या 'हे' आरोग्यदायी फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Care