रिकाम्या पोटी 'या' फळांचं सेवन करणं टाळा, अन्यथा... Health Tips

Aishwarya Musale

निरोगी आरोग्यासाठी उत्तम जीवनशैली आणि खाण्या-पिण्याची वेळ योग्य असणं देखील महत्त्वाचं असतं.

Health tips | sakal

बहुतांश लोकांना ही गोष्ट ठाउक आहे की कॅफिनयुक्त पदार्थांचे रिकाम्या पोटी सेवन करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

Health tips | sakal

काही फळांचे रिकाम्या पोटी सेवन केल्यामुळे काही आरोग्यविषयक समस्या देखील उद्भवू शकतात. फळं आरोग्यासाठी उत्तम मानली जातात.

Health tips | sakal

पण या फळांचे सेवन देखील उत्तम आणि योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. फळं खाण्याची योग्य वेळ कोणती आणि याचा शरीरावर काय परिणाम होतो याची माहिती प्रत्येकाला असली पाहिजे.

Health tips | sakal

आंबा

रिकाम्या पोटी आंब्याचे सेवन करणं शरीरासाठी घातक ठरू शकतं. कारण या फळामध्ये साखरेचं प्रमाण अधिक असतं. रिकाम्या पोटी या फळाचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण अधिक वाढू शकतं.

Health tips | sakal

लिची

लिची रिकाम्या पोटी खाल्याने शरीरामधील रक्तातील साखरेचं प्रमाण जलद गतीने वाढते. तसेच याचे अयोग्य पद्धतीने सेवन केल्यामुळे पोटामध्ये गॅस देखील निर्माण होतो.

Health tips | sakal

केळ

केळ्यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असते. यामुळे शरीरामधील रक्तप्रवाह जलद गतीने होतो. शरीरामधील रक्तप्रवाह जलद गतीने होत असल्यामुळे हृदयविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक असते.

Health tips | sakal

संत्री

रिकाम्या पोटी संत्र्याचे सेवन करणं देखील आरोग्यासाठी नुकसानदायी ठरू शकतं. कारण यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण अधिक असते. यामध्ये समाविष्ट असलेल्या सायट्रिक एसिडमुळे पोटामध्ये जळजळ होण्यास सुरुवात होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health tips | sakal