वजन कमी करण्यासाठी 'या' मसाल्यांची घ्या मदत

Monika Lonkar –Kumbhar

वजन वाढणे

आजकालचे धकाधकीचे जीवन, बिघडलेली जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक समस्या ही वजनवाढीची आहे.

Spices for Weight loss

वजन कमी करण्यासाठी

या समस्येपासून मुक्त होण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. कधी डाएट तर कधी जिमचा आधार घेतला जातो. मात्र, अशा परिस्थितीमध्ये ही तुमचे वजन कमी होत नसेल, तर याचा अर्थ तुमची चयापचयाची क्रिया ही मंदावली आहे.

Spices for Weight loss

स्वयंपाकघरातील मसाले

मंद झालेली चयापचयाची क्रिया वाढवण्याची क्षमता या मसाल्यांमध्ये आहे. जे तुमच्या शरीरातील चयापचयाची (मेटॅबॉलिजम) क्रिया वाढवण्याचे काम करतात.

Spices for Weight loss

हळद

हळदीमध्ये आढळून येणाऱ्या करक्यूमिन या संयुगामुळे आपल्या शरीरातील चयापचयाची क्रिया वाढवण्यास मदत होते. शिवाय, शरीरातील कॅलरीज देखील मोठ्या प्रमाणात बर्न होतात. त्यामुळे, हळद अतिशय फायदेशीर ठरते.

Spices for Weight loss

दालचिनी

काही वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, दालचिनी शरीरातील चयापचयाची क्रिया वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. दालचिनीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्याच्या सेवनामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

Spices for Weight loss

बडीशेप

जेवण झाल्यानंतर आपण आवर्जून बडीशेप खातो. बडीशेप खाल्ल्यामुळे जेवण लवकर पचते आणि चयापचयाची क्रिया देखील वाढते. त्यामुळे, बडीशेपचा तुमच्या आहारात जरूर समावेश करा आणि वजन कमी करण्याचा प्रवास आणखी सोपा करा.

Spices for Weight loss

जिरे

जिऱ्यामध्ये असलेले पोषकघटक हे आपल्या शरीरातील चयापचय क्षमता वाढवण्यास मदत करतात. जिऱ्यामुळे आपल्याला ऊर्जा ही मिळते आणि वजन कमी होण्यासही मदत होते.

Spices for Weight loss

हिवाळ्यात हॉट चॉकलेट खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hot Chocolate Benefits | esakal