सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ औषधी वनस्पतींचे करा सेवन

Monika Lonkar –Kumbhar

थंडीचा कडाका

सध्या देशातील अनेक भागांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. या थंडीचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे, या दिवसांमध्ये ताप, सर्दी आणि खोकल्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात.

Health Care

तुम्ही काही औषधी वनस्पतींचे सेवन केल्याने सर्दी-ताप आणि खोकल्यापासून आराम मिळू शकतो.

Health Care

लहान मुले आणि वयोवृद्ध

लहान मुले आणि वृद्धांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे, हिवाळ्यात सर्दी-ताप आणि खोकल्याच्या समस्या लहान मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात.

Health Care

तुळस

तुळस ही एक अशी औषधी वनस्पती आहे, जी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. सर्दी-खोकला आणि तापापासून आराम मिळवून देण्याचे काम तुळस करते.

Health Care

तुम्ही तुळशीच्या पानांचा काढा करून पिऊ शकता किंवा सॅलेडच्या रूपात ही तिचा वापर करू शकता. तुळशीची पाने चघळल्याने देखील तुम्हाला सर्दी-ताप आणि खोकल्यापासून आराम मिळू शकतो.

Health Care

लसूण

लसणाचा वापर हा अनेक औषधांमध्ये केला जातो. लसणामध्ये ऍलिसिन नावाचे एक संयुग आढळून येते. या संयुगामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात. या संयुगाच्या अँटीव्हायरल गुणधर्मांमुळे सर्दी-ताप आणि खोकल्याची लक्षणे कमी होऊ शकतात.

Health Care

सर्दी-खोकला आणि तापापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जेवणासोबत भाजलेले लसूण खाऊ शकता. तसेच, स्वयंपाक करताना भाज्यांमध्ये या भाजलेल्या लसणाचा वापर करू शकता.

Health Care

चिमुकल्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये दंत आरोग्याची महत्वाची भूमिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dental Health