कोरड्या केसांसाठी फायदेशीर आहे 'हा' होममेड हेअर मास्क

Monika Lonkar –Kumbhar

हिवाळा

हिवाळ्यात आरोग्यासोबतच आपल्याला त्वचेची आणि केसांची खास काळजी घ्यावी लागते.

Hair Care Tips

कोरडे केस

थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी होण्यासोबतच तुमचे केस देखील कोरडे होतात. मग, या कोरड्या केसांमुळे तुमचा संपूर्ण लूकच खराब दिसू लागतो.

Hair Care Tips

केसांच्या समस्या

केस कोरडे झाल्यामुळे केसांमध्ये गुंता मोठ्या प्रमाणात होऊ लागतो. शिवाय, या कोरडेपणामुळे टाळूला खाज येणे, केस गळणे, केस फ्रिझी होणे इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागते.

Hair Care Tips

कोरफड

कोरफडमध्ये व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात आढळून येते. या व्हिटॅमिनमुळे केसांचे योग्य प्रकारे पोषण होते आणि केस हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

Hair Care Tips

नारळाचे तेल

कोरफडसोबत नारळाचे तेल देखील तुमच्या केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. नारळाच्या तेलामुळे केसांचे छान पोषण होते आणि केस मऊ होण्यास मदत होते.

Hair Care Tips

हेअरपॅक

कोरफड आणि नारळाच्या तेलाचा हेअरमास्क बनवण्यासाठी सर्वात आधी कोरफडचा गर घ्या किंवा कोरफड जेल घ्या. त्यामध्ये, आता नारळाचे तेल मिसळा. आता तुमचा हेअर मास्क तयार आहे. 

Hair Care Tips

केस धुवा

या हेअर मास्कच्या मदतीने केसांना छान मसाज करा. ३० ते ४० मिनिटांनंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून टाका. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या हेअर मास्कमध्ये व्हिटॅमिन ई च्या कॅप्सूल देखील मिसळू शकता.

Hair Care Tips

त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी सफरचंदाची घ्या मदत, बनवा 'हे' फेसपॅक्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

apple face packs | esakal