वाढत्या वयानुसार हाडे होतात कमजोर; बळकटीसाठी आहारात 'या' पोषकघटकांचा करा समावेश

Monika Lonkar –Kumbhar

हाडे कमजोर

वय जसे वाढत जाते, तसे शरीरातील हाडे कमजोर होऊ लागतात. हाडे कमजोर झाली की सांध्यामध्ये वेदना होणे, सांधेदुखी होणे इत्यादी अनेक समस्या निर्माण होतात.

Bones Health

संतुलित आहार

हाडांच्या बळकटीसाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे अतिशय महत्वाचे आहे.

Bones Health

पोषकघटक

आहारात भरपूर व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शिअम आणि प्रोटिन्सने युक्त असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश असणे फायदेशीर आहे. यामुळे, एकूणच आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी मदत होते आणि हाडांना देखील बळकटी मिळते. 

Bones Health

आहारात समाविष्ट करा कॅल्शिअम

हाडांच्या बळकटीसाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शिअमचा आहारात समावेश असणे हे अतिशय महत्वाचे आहे. कॅल्शिअममुळे हाडांना बळकटी मिळते आणि योग्य पोषण मिळते.

Bones Health

कॅल्शिअमयुक्त खाद्यपदार्थ जसे की, दूध, दही, डेअरी प्रॉडक्ट्स, बदाम, ब्रोकोली, केळी आणि सोया उत्पादने इत्यादी खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा. 

Bones Health

प्रथिनांनी समृद्ध खाद्यपदार्थ आवश्यक

जर तुम्हाला मजबूत हाडे हवी असतील तर प्रथिनांनी समृद्ध असलेल्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश असणे हे फार महत्वाचे आहे. आपल्या शरीरातील ५०% हाडे ही प्रथिनांनी बनलेली असतात. हे आपण विसरता कामा नये.

Bones Health

प्रथिनांनी युक्त असलेला राजमा, दूध, हरभरा, मांस, मासे, कडधान्ये, अंडी, वाटाणा, पालक, मशरूम इत्यादी खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा.

Bones Health

व्हिटॅमिन डी आहे महत्वाचे

व्हिटॅमिन डी हे आपल्या आरोग्यासाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी अतिशय फायदेशीर आहे. व्हिटॅमीन डी ने युक्त असलेले खाद्यपदार्थ जसे की, मासे, अंडी, मशरूम, सोया मिल्क, चीज इत्यादी पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा.

Bones Health

हिवाळ्यात व्यायाम करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

winter Fitness Tips