Threads by Instagram : कसं आहे इन्स्टाग्रामचं नवीन अ‍ॅप? पाहा फोटो

Sudesh

थ्रेड्स

इन्स्टाग्रामने थ्रेड्स हे एक नवीन अ‍ॅप लाँच केलं आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत घोषणा केली.

Threads by Instagram | eSakal

टेक्स्ट बेस्ड-अ‍ॅप

इन्स्टाग्राम हे मुख्यत्वे फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगसाठीचं अ‍ॅप आहे. तर, थ्रेड्स हे शब्दांच्या माध्यमातून विचार शेअर करण्यासाठीचे अ‍ॅप असणार आहे.eSakal

Threads by Instagram | eSakal

ट्विटरला टक्कर

या अ‍ॅपच्या माध्यमातून ट्विटरला थेट टक्कर देण्याचा मेटाचा विचार आहे.

Threads by Instagram | eSakal

१०० देशांमध्ये लाँच

थ्रेड्स हे अ‍ॅप १०० हून अधिक देशांमध्ये लाँच करण्यात आलं आहे. भारतात देखील हे उपलब्ध आहे.

Threads by Instagram | eSakal

इन्स्टाग्राम लॉग-इन

थ्रेड्सवर लॉग-इन करण्यासाठी तुम्ही इन्स्टाग्रामच्या क्रेडेन्शिअल्सचा वापर करू शकता. तुम्ही इन्स्टाग्रामचं यूजरनेमही यावर ठेऊ शकता.

Threads by Instagram | eSakal

इन्स्टाग्राम फॉलोवर्स

तुम्ही इन्स्टाग्रामवर ज्यांना फॉलो करता, त्या सर्वांना थ्रेड्स अ‍ॅपवर फॉलो करू शकाल. त्यांपैकी जे यूजर्स थ्रेड्स अ‍ॅप डाऊनलोड करतील त्यांना आपोआप फॉलो रिक्वेस्ट जाईल.

Threads by Instagram | eSakal

ट्विटरसारखी पोस्ट

तुम्ही या अ‍ॅपवर ट्विटर प्रमाणेच कमी शब्दांमध्ये पोस्ट करू शकणार आहात.

Threads by Instagram | eSakal

लोकांशी व्हा कनेक्ट

इतर लोकांनी केलेल्या पोस्टना तुम्ही रिअ‍ॅक्शन आणि त्यावर प्रतिक्रिया देखील देऊ शकाल.

Threads by Instagram | eSakal

ट्विटरला टेन्शन

या अ‍ॅपमुळे ट्विटरचं टेन्शन वाढलं आहे. कारण ट्विटरवर यूजर्सना बंधनं घालण्यात येत आहेत. यामुळे वैतागलेल्या लोकांना ट्विटरच्या जागी एक वेगळा पर्याय मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Threads by Instagram | eSakal