फिरण्यासाठी जगातील सर्वात सुंदर आणि सर्वात स्वस्त असे १० देश

रफिक पठाण

नेपाळ : तुमच्याकडे जर फिरण्यासाठी पूर्ण एक आठवडा आहे तर नेपाळ (Nepal) सर्वात सुंदर पर्यटन तुम्हाला घडवू शकतो. याठिकाणी तुम्हाला मंदिरे, अभयारण्य, ट्रेकिंग इत्यादींचा आनंद घेता येऊ शकतो. संपूर्ण ट्रिपचा साधारण खर्च हा ३० ते ४० हजार रुपये इतका येईल.

Nepal

भुतान: जगातील लहान आणि गरीब देश अशी जरी भुतानची (Bhutan) ओळख असली तरी सर्वात सुंदर देशांमध्ये त्याचा समावेश होतो. याठिकाणी ट्रेक, साहसी खेळ, धार्मिक यात्रा, वन्यजीव सहल इत्यादींचे पर्यटन करता येते. त्राशीगंग, हा व्हॅली, ट्रॉगस, डोचला पास इत्यादी अनेक सुंदर ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. ७ दिवसांच्या संपूर्ण ट्रिपचा खर्च हा केवळ ३० ते ३५ हजार रुपये इतका येतो.

Bhutan

व्हिएतनाम: जगातील सर्वात सुंदर आणि स्वस्त देश म्हणून व्हिएतनामची (Vietnam) ओळख आहे. याठिकाणी क्रूज, लोकल मार्केट, गुफा, सांस्कृतिक, वन्यजीव अश्या पर्यटनाचा आपण आनंद घेऊ शकता. हनोई, हो ची मिह, सापाया सुंदर शहरांना तुम्ही भेट देऊ शकता. याठिकाणी ८ दिवसांच्या संपूर्ण ट्रिपचा खर्च ४०-४५ हजार रुपयापर्यंत येईल.

Vietnam

म्यानमार: जगातील सर्वात सुंदर ऐतिहासिक संस्कृती असलेला देश म्हणजे म्यानमार (Myanmar). याठिकाणी हॉट एअर बलून राईड, नेचर वॉक, लोकल शॉपिंग, खाद्य संस्कृती इत्यादींचा आनंद घेता येऊ शकतो. यांगॉन, बागान, मंडाले, गोल्डन रॉक पॅगोडा, पुटाओ, इत्यादी ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. याठिकाणी फिरण्याचा खर्च साधारण ५० ते ६० हजार रुपयांपर्यंत येऊ शकतो.

Myanmar

युनाइटेड अरब एमिरात (UAE): सध्या संपूर्ण जगातील सर्वात सुंदर आणी पर्यटकांनी नेहमीच गजबजलेला देश म्हणजे युनाइटेड अरब एमिरात (United Arab Emirates). याठिकाणी अनेक पर्यटक शॉपिंगसाठी येत असतात. दुबई डेसर्ट सफारी, लक्जरी टूर्स, स्पोर्ट्स टुरिजम, इनडोर स्किंग, बुर्ज खलिफा, दुबई, शारजाह आणि अबू धाबी अश्या अनेक गोष्टींचा आपण आनंद घेऊ शकतो. याठिकाणी फिरण्याचा खर्च जवळपास ६० ते ७० हजार रुपये येतो.

UAE

ओमान: सुंदर समुद्र किनारे, वाळवंट, सुंदर किल्ले यांचे पर्यटन करण्याची ईच्छा असेल तर ओमान (Oman) सर्वात सुंदर देश आहे. मूर्त सोक, सुलतान कबूस मशीद, खसाब बीच, अल कुरुम बीच, रस अल जीन, वादी बानी खालिद याठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. याठिकाणी फिरण्यासाठी ६५- ७० हजार रुपये खर्च येतो.

Oman

इंडोनेशिया: जगातील सर्वात जास्त निसर्गाची देण मिळालेला देश म्हणजे इंडोनेशिया (Indonesia) . नेचर टुरिजम, वोलकानो टूर, वाटर स्पोर्ट्स , धार्मिक पर्यटनासाठी हा देश प्रसिद्ध आहे. बाली,जकार्ता, मलंग, लोम्बोक, बांडुंग या शहरांना आपण भेट देऊ शकता. ८ दिवसाच्या पर्यटनासाठी ७० हजार रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो.

Indonesia

मलेशिया: सुंदर समुद्र किनारे आणि हिरव्यागार निसर्गाने नटलेला देश म्हणजे मलेशिया (Malaysia). याठिकाणी फिरायला ५० ते ६० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.

Malaysia

फिलिपाईन्स: निसर्गाचे अद्भुत रूप अनुभवयाला पर्यटक फिलिपाईन्सला (Philippines) भेट देत असतात. याठिकाणी ७ दिवस फिरण्याचा खर्च ४० हजार रुपयांपर्यंत येतो.

Philippines

थायलंड: शॉपिंगसाठी भरमसाठ ऑप्शन्स आणि एक नयनरम्य संध्याकाळ असाच उल्लेख थायलंडचा (Thailand) केला जातो. याठिकाणी ५ दिवस फिरण्याचा खर्च ३५ ते ४५ हजार इतका येतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand