महाराष्ट्रातील ही १० नयनरम्य धबधबे

रफिक पठाण

भिवपुरी धबधबा - कर्जत जवळील भिवपुरी गावात हा धबधबा असून पावसाळयात हा परिसर संपूर्णपणे निसर्गाच्या रंगात रंगलेला असतो.

Bhivpuri Waterfalls

तुंगारेश्वर धबधबा - वसईत हिरव्या पहाडांनी नटलेल्या तुंगारेश्वर मध्ये हा धबधबा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी ट्रेकर्स मंडळी पावसाळ्याची वाट पाहत असतात.

Tungareshwar Waterfall

पांडवकडा धबधबा - शहराच्या धकाधकीच्या जीवनात शहरातीलच एक अतिशय निसर्गरम्य धबधबा नवी मुंबईकरांसाठी निसर्गाची देण आहे. खारघर जवळ पांडवकडा धबधबा असून अनेक पर्यटक याठिकाणी भेट देत असतात.

Pandavkada

वांगणी धबधबा - वांगणीजवळ असलेल्या या धबधब्याला भगीरथ धबधबा असं देखील म्हणतात. पर्यटकांची विशेष गर्दी याठिकाणी होते.

Vangani Waterfall

ठोसेघर धबधबा - साताऱ्यापासून २० किमी अंतरावर असलेला तब्बल ५०० मीटर उंच असा हा धबधबा आहे. निसर्गाच्या कुशीत लपलेलं हे सुंदर ठिकाण आहे.

Thoseghar Waterfall

लिंगमळा धबधबा - महाबळेश्वरपासून फक्त ६ किमी अंतरावर असलेला हा धबधबा पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतो. ऑगस्ट ते डिसेंबर पर्यंत पर्यटकांची गर्दी याठिकाणी पाहायला मिळते.

Lingmala Waterfall

दुगरवाडी धबधबा - चोही बाजूने झाडीने नटलेल्या दुगरवाडीमध्ये हा धबधबा असून हे ठिकाण नाशिकपासून ३० किमी अंतरावर आहे.

Dugarwadi Waterfall

रंधा धबधबा - भंडारदरापासून १२ किमी लांब असलेला हा सुंदर धबधबा. निसर्गाच्या कुशीतील सर्वात सुंदर असे गड- किल्ले असलेल्या डोंगररांगेत हा धबधबा आहे.

Randha Waterfalls

वज्राई धबधबा- सातारा जिल्ह्यातील कास पठाराजवळ हा धबधबा असून पर्यटकांसाठी हा सुंदर धबधबा एक महत्वाचे आकर्षण आहे.

Vajrai Waterfalls

कुणे धबधबा - मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला माहिती असलेलं हे ठिकाण म्हणजे खंडाळा. खंडाळ्यात हा धबधबा असून तो भारतातील मोठ्या धबधब्यांपैकी एक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kune Waterfalls