भारतातील 7 सर्वात श्रीमंत बाबा कोण आहेत?

राहुल शेळके

भारतात अध्यात्माला खूप महत्त्व आहे आणि त्यामुळेच देशात मोठ्या प्रमाणात गुरु आणि बाबा आहेत. मोठा प्रभाव असलेल्या या बाबांच्या महागड्या आश्रमांमध्ये भक्तांची गर्दी असते.

top 7 richest spiritual gurus in india | Sakal

जगभरात लाखो अनुयायी असलेल्या या आध्यात्मिक गुरूंकडे अफाट संपत्ती आहे. भारतातील 7 सर्वात श्रीमंत आणि सर्वात प्रभावशाली अध्यात्मिक गुरू कोण आहेत?

top 7 richest spiritual gurus in india | Sakal

सद्गुरु जग्गी वासुदेव

प्रसिद्ध आध्यात्मिक आणि योगगुरू सद्गुरु जग्गी वासुदेव हे ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. टाईम्स ऑफ इंडियानुसार, 2023 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 18 कोटी रुपये होती. त्यांच्याकडे अनेक योग केंद्रे, शैक्षणिक संस्था आणि पर्यावरणीय प्रकल्प आहेत.

top 7 richest spiritual gurus in india | Sakal

श्री श्री रविशंकर

श्री श्री रविशंकर हे सुप्रसिद्ध आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे संस्थापक आहेत. अध्यात्माच्या माध्यमातून लोकांचे जीवन चांगले बनवण्यासाठी ते जगभर ओळखले जातात. टाईम्स ऑफ इंडियानुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे 1,000 कोटी रुपये आहे.

top 7 richest spiritual gurus in india | Sakal

बाबा रामदेव

बाबा रामदेव हे एक यशस्वी योगगुरू आणि उद्योगपती आहेत. भारतात त्यांनी पतंजली आयुर्वेदाच्या माध्यमातून करोडोंचे साम्राज्य निर्माण केले. त्यांची एकूण संपत्ती 1600 कोटी रुपये आहे.

top 7 richest spiritual gurus in india | Sakal

माता अमृतानंदमयी अम्मा

माता अमृतानंदमयीला लोक प्रेमाने अम्मा म्हणतात. त्या केरळच्या असून त्यांचा जन्म 27 सप्टेंबर 1953 रोजी झाला होता. त्या अमृतानंदमयी ट्रस्टच्या प्रमुख आहेत आणि TOI अहवालानुसार, त्यांच्याकडे 1500 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

top 7 richest spiritual gurus in india | Sakal

गुरमीत राम रहीम सिंह

राम रहीमची गणना आजही देशातील सर्वात श्रीमंत बाबांमध्ये केली जाते. 1990 पासून डेरा सच्चा सौदाचा प्रमुख असलेल्या राम रहीमचे हजारो फॉलोअर्स आहेत. राम रहीम सिंहची अंदाजे एकूण संपत्ती 1455 कोटी रुपये आहे.

top 7 richest spiritual gurus in india | Sakal

आसाराम बापू

आसाराम बापूंचे जगभरात 350 आश्रम आणि 17,000 बालसंस्कार केंद्रे आहेत. 2021मध्ये ट्रस्टने एकूण 350 कोटी रुपयांची कमाई केली होती.

top 7 richest spiritual gurus in india | Sakal

स्वामी नित्यानंद

स्वामी नित्यानंद यांनी नित्यानंद ध्यानपीठम फाउंडेशन सुरू केले. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, स्वामी नित्यानंद यांची एकूण संपत्ती 10,000 कोटी रुपये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

top 7 richest spiritual gurus in india | Sakal