कर्नाटक: उत्तर कन्नडमधील best attractions!

Swapnil Kakad

ओम बीच

नावाप्रमाणेच "ॐ" आकाराचा हा बीच गोकर्णमधील एक महत्वाचे आकर्षण आहे. येथील कमी वर्दळ, शांतता आणि निसर्गरम्य वातावरण मनाला नक्कीच सुखावणारे आहे.

ॐ beach | esakal

याना रॉक्स

प्रचंड काळा, स्फटिकासारखे कार्स्ट चुनखडीच्या बनलेले हे २ मोठे खडक - भैरवेश्वर शिखर आणि मोहिनी शिखर पर्यटनाचे आकर्षण आहे. हि दोन्ही शिखरे येथे पवित्र मानली जातात.

yana caves | esakal

मिरजन किल्ला

भारतातील स्त्रियांनी बांधलेल्या काही किल्ल्यांपैकी एक. येथील स्थानिक माहितीनुसार गेरसोप्पाच्या राणी चेन्नाभैरदेवीने (विजयनगर साम्राज्याअंतर्गत) हा किल्ला बांधला आणि तब्बल ५४ वर्षे ह्या प्रदेशावर राज्य केले.

mirjan fort | esakal

नेत्रानी आयलंड

मुरुडेश्वरजवळील हे आयलंड स्कुबा डायविंग आणि स्नॉर्केलिंगसाठी उत्तम ठिकाण आहे.

netrani island

उंचाल्ली फॉल्स

उंचाल्ली फॉल्स किंवा लशींगटन फॉल्स हा अघनाशिनी नदीच्या प्रवाहातून निघतो.

unchalli falls

मुरुडेश्वर

कर्नाटकातील महत्वाच्या पर्यटन आकर्षणांपैकी एक, इथे तुम्हाला जगातील दुसऱ्या सर्वात उंच शंकराच्या मूर्तीचे दर्शन घडते.

murdeshwar

देवबाग आणि तारकर्ली

गोव्यापासून ब्रेक घेऊन ह्या ट्वीन कोस्टल गावांना एकदा भेट द्या! इथल्या शांत आणि सुंदर बीचेसवर तुम्ही निवांत सुट्टीचा आनंद घेऊ शकता.

devbagh beach

अप्सराकोंडा

होन्नावरपासून ७ किलोमीटर दूर हे टुरिस्ट व्हिलेज येथील सुंदर बीचेस आणि धबधबे ह्यांमुळे ऑफबीट व्हेकेशनचा एक उत्तम पर्याय आहे.

apsara konda

जोग फॉल्स

भारतातील सर्वात मोठ्या आणि उंच धबधब्यांपैकी एक ह्या धबधब्याचा आकार आणि उंची केवळ थक्क करणारे आहेत!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

jog falls