ये काली काली आँखे… डार्क सर्कल्ससाठी करा हे उपाय Dark Circles

Aishwarya Musale

आजकाल अनेक लोकांच्या डोळ्याभोवती डार्क सर्कल्स दिसू लागतात. ही डार्क सर्कल्स तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य कमी करतात.

dark cirlces | sakal

डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये अपुरी झोप, तणाव, खाण्याच्या अयोग्य सवयी, मद्यपान आणि धूम्रपान इत्यादींचा समावेश होतो.

dark cirlces | sakal

अशा परिस्थितीत बरेच लोक रसायनयुक्त पदार्थ वापरतात. पण त्यांचा प्रभाव फार काळ टिकत नाही. यासोबतच ही उत्पादने महागही असतात.

dark cirlces | sakal

डार्क सर्कल्सचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक उपायही करून पाहू शकता. डार्क सर्कल्सची समस्या दूर करण्यासाठी या गोष्टी कामी येतील.

dark cirlces | sakal

बटाटा

डार्क सर्कल कमी करण्यासाठी तुम्ही बटाटे वापरू शकता. यासाठी बटाटा किसून घ्या. त्याचा रस काढा. तो डोळ्याभोवती लावून ठेवा. बटाट्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे त्वचेचा काळेपणा दूर होतो.

dark cirlces | sakal

कोरफड

कोरफडीमध्ये एलोसिन असते. त्यामुळे पिगमेंटेशन कमी होते. हे डोळ्यांखालील त्वचा मऊ करते. कोरफडीच्या रसामध्ये लिंबाचा रस, मध आणि गुलाब पाणी मिसळा. या गोष्टी डार्क सर्कल्सवर लावा.

dark cirlces | sakal

बदामाचे तेल

या तेलात व्हिटॅमिन ई असते. हे डोळ्यांभोवतीची त्वचा हायड्रेट करण्याचे काम करते. या तेलाने डोळ्याभोवती काही काळ मसाज करू शकता. हे रक्ताभिसरण सुधारते.

dark cirlces | sakal

केशर

थंड दुधात केशराचे काही धागे टाका. काही काळ असेच राहू द्या. यानंतर, कॉटन बॉल वापरून, हे मिश्रण त्वचेभोवती लावा. यामुळे डार्क सर्कल्स कमी होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

dark cirlces | sakal