सकाळी मुलं उठायला कंटाळा करतात? वापरा या 4 ट्रिक्स

Aishwarya Musale

लहान मुलं

लहान मुलांना सकाळी लवकर उठण्यात अडचणी येत असतील तर पालक म्हणून तुम्ही आपल्या मुलांची अडचण समजून घेतली पाहिजे. आपलं मुलं सकाळी लवकर का उठत नाही

kids | sakal

झोप

त्याला काही समस्या आहेत का? याचा शोध घेतला पाहिजे. मुलांना रात्रीची झोप येत नाही का? त्यांची झोप पूर्ण होत नाही का?

kids | sakal

योग्य नियोजन

हे लक्षात घेऊन त्यानुसार योग्य नियोजन केले पाहिजे. 3 ते 5 वर्षांच्या मुलांना दिवसातून 10 ते 13 तासांची झोप पुरेशी असते.

kids | sakal

12 तासांची झोप आवश्यक

6 ते 10 वर्ष वयोगटातील मुलांना 9 ते 12 तासांची झोप आवश्यक असते. शाळेत जाणाऱ्या मुलांना किमान 10 तासांची झोप आवश्यक असते.

kids | sakal

मोबाईल फोन देऊ नका

तेव्हा सकाळी लवकर शाळा असणाऱ्या मुलांना पालकांनी रात्री लवकर झोपवण्याचा प्रयत्न करा. तसेच झोपण्याच्यावेळी त्यांना मोबाईल फोन देऊ नका.

kids | sakal

शाळा

सकाळी मुलं लवकर उठण्यासाठी कंटाळा करतात, परंतु पालक म्हणून त्यांना झोपेतून उठवताना प्रेमाने उठवा. त्यांना शाळेत जाण्याचा चांगल्या गोष्टी सांगा.

kids | sakal

नाश्ता

मुलांना सकाळी त्यांच्या नाश्त्यात त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून खाऊ घाला.

kids | sakal

आवडीचे पदार्थ

तसेच डब्यातही त्यांच्या आवडीचे पदार्थ द्या म्हणजे ते या आशेने चटकन उठतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kids | sakal