हातात 'या' गोष्टी ठेवून तुळशीला प्रदक्षिणा घालणे मानले जाते शुभ

Monika Lonkar –Kumbhar

तुळशीचा विवाह

आज तुळशीचा विवाह असून आजच्या दिवशी भगवान विष्णूंचा शाळिग्राम रूपात तुळशीसोबत विवाह केला जातो.

Tulsi vivah 2023

तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त

तुळशी विवाहाची द्वादशी तिथी ही गुरूवारी २३ नोव्हेंबरला ९ वाजून १ मिनिटांनी सुरू झाली असून आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ही तिथी असणार आहे. या शुभ मुहूर्तावर तुळशीचा विवाह लावा.

Tulsi vivah 2023

तुळशी विवाह आणि प्रदक्षिणा

तुळशी विवाह पार पडल्यानंतर तुळशीला प्रदक्षिणा घालणे शुभ मानले जाते. त्यामुळे, अनेक जण तुळशीचा विवाह पार पडल्यानंतर तुळशीला प्रदक्षिणा घालतात.

Tulsi vivah 2023

काळे तीळ

हातात काळे तीळ घेऊन तुळशीला प्रदक्षिणा घातल्याने कोणत्याच अडचणींचा सामना करावा लागत नाही. तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळते, असे मानले जाते. त्यामुळे, हातात काळे तीळ घेऊन तुळशीला जरूर प्रदक्षिणा घालावी.

Tulsi vivah 2023

गहू

तुळशीचा विवाह केल्यानंतर हातात गहू घेऊन तुळशीला प्रदक्षिणा घालावी. हातात गहू घेऊन तुळशीला प्रदक्षिणा घातल्याने बिघडलेली कामे लवकर पूर्ण होतात. तसेच, अनेक शुभ कार्ये सफल होतात असे मानले जाते.

Tulsi vivah 2023

तुळशीची मंजिरी आणि हळद

तुळशीचा विवाह पार पडल्यानंतर हातात तुळशीची मंजिरी आणि त्यासोबत चिमूटभर हळद घेऊन तुळशीला प्रदक्षिणा घालावी. असे केल्याने तुम्हाला लवकरच विवाहाचा प्रस्ताव मिळू शकतो, अशी देखील मान्यता आहे.

Tulsi vivah 2023

भगवान विष्णू

तुळशीच्या लग्नाच्या दिवशी भगवान विष्णूंचा शाळिग्राम रूपात तुळशीसोबत विवाह लावला जातो. त्यामुळे, आजच्या दिवशी भगवान विष्णूंना गोड पदार्थांचा अवश्य नैवेद्य दाखवावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tulsi vivah 2023