प्रणाली मोरे
सेलिब्रिटी बनण्यासाठी स्टार्सना अनेक अडचणीतून जावं लागतं. मेहनत आहेच पण कास्टिंग काऊच हा भयानक जीवघेणा प्रकारही आहे. या कास्टिंग काऊचचा सामना अनेक अभिनेत्यांनाही करावा लागला आहे.
मोहित मलिकला या कास्टिंग काऊच प्रकाराने हातातून मोठा प्रोजेक्ट गमवावा लागलाय. एकानं मोहित सोबत खूप घाणेरडा प्रकार करण्याचा प्रयत्न केला,ज्यामुळे मोहित ऑडिशन सोडून पळून गेला होता.
अभिनेता अंकित सिवाचला भूमिकेसाठी गरज नसतानाही न्यूड फोटोची डिमांड एका व्यक्तीनं केली होती. आणि ज्या पार्ट्यांचे कामाशी काहीच घेणे-देणे नाही अशा ठिकाणी जाण्यास सांगितले होते.
ऋत्विक धनजानीला ऑडिशनच्या नावाखाली एका घाणेरड्या रुममध्ये नेलेले. तिथे त्याच्याशी एजंटने शारिरीक चाळे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अभिनेता पळून गेला होता.
जेव्हा रणवीर सिंगनं त्याच्या कास्टिंग काऊचच्या एक्सपीरियन्सविषयी सांगितले होते. त्यानंतर टी.व्ही अभिनेता करण टॅकरने देखील रणवीरनं सांगितलेल्या व्यक्तीचे नाव घेत खुलासे केले होते.
करण टॅकर म्हणाला,''कास्टिंग डायरेक्टरने मला देखील विचारलं होतं,तुला मेहनत करायची आहे की स्मार्ट काम करायचं आहे?''
टी.व्ही आणि सिने स्टार राजीव खंडेलवालला एका दिग्दर्शकांन अशा काही डिमांड केल्या की त्यानंतर राजीव म्हणाला होता,''माझी गर्लफ्रेंड आहे आणि मला अशा गोष्टीत रस नाही''.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.