स्मार्ट फीचर्ससह लाँच झाली TVS Raider 125; पाहा किंमत

Sudesh

TVS Raider

टीव्हीएस कंपनीने आपली रेडर १२५ ही बाईक पुन्हा लाँच केली आहे. यामध्ये काही मोठे अपडेट देण्यात आलेले आहेत.

TVS Raider 125 | eSakal

Smartxonnect

स्मार्टएक्सोनेट टेक्निकसोबत ही बाईक पुन्हा लाँच करण्यात आली आहे. यामध्ये आता स्मार्ट कनेक्ट आणि इतर आधुनिक फीचर्स मिळणार आहेत.

TVS Raider 125 | eSakal

अपडेट

अपडेटनंतर या गाडीचा लुक आणखी आकर्षक झाला आहे. तसेच, गाडीचं मायलेज देखील वाढलं आहे.

TVS Raider 125 | eSakal

इंजिन

TVS Raider 125 Smartxonnect बाईकमध्ये एअर कूल्ड थ्री व्हॉल्व इंजिन देण्यात आलं आहे. १२४.८ सीसी क्षणतेचं हे इंजिन ११.२ बीएचपी पॉवर आणि ११.२ एनएन टॉर्क जनरेट करतं. यामध्ये ५ स्पीड गिअरबॉक्स दिला आहे.

TVS Raider 125 | eSakal

स्मार्ट फीचर्स

यामध्ये ५ इंच मोठी टीएफटी स्क्रीन देण्यात आली आहे. ही स्क्रीन स्मार्ट कनेक्टशी जोडलेली आहे. याच्या माध्यमातून कॉल, मेसेज, नोटिफिकेशन, वेदर, नेव्हिगेशन असे फीचर्स वापरता येतात.

TVS Raider 125 | eSakal

खास फीचर

तुमच्या गाडीचं पेट्रोल जर संपत आलं असेल, तर ही बाईक आपोआपच जवळचा पेट्रोल पंपाचं लोकेशन आपल्या स्क्रीनवर दाखवते.

TVS Raider 125 | eSakal

ब्रेकिंग

या बाईकमध्ये पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक, तर मागच्या बाजूला ड्रम ब्रेकिंग दिलं आहे. यामध्ये एसबीएस ब्रेकिंग सिस्टीम दिली आहे.

TVS Raider 125 | eSakal

किंमत

या बाईकची एक्स शोरूम किंमत ९९,९९० रुपये एवढी आहे.

TVS Raider 125 | eSakal

मायलेज

ही बाईक एक लिटर पेट्रोलला ६७ किलोमीटर एवढं मायलेज देते असा दावा कंपनीने केला आहे. हायवेवर हे मायलेज ६५ किलोमीटर प्रति लिटर असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. गाडीची फ्युएल कपॅसिटी १० लीटर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TVS Raider 125 | eSakal