Umran Malik : उमरानला हाताळणं हैदराबादला जमलंच नाही!

अनिरुद्ध संकपाळ

भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान याने 23 वर्षाच्या वेगवान गोलंदाजाबाबत मोठे वक्तव्य केले.

जहीर म्हणाला, उमरान मलिकला त्याच्या फ्रेंचायजीने योग्यप्रकारे हाताळले नाही असं मला वाटतं.

ज्या प्रकारे फ्रेंचायजीने त्याला हाताळले मला वाटते की हैदराबादने त्याचा अजून अधिक वापर करायला हवा होता.

ज्यावेळी तुम्ही एखाद्या युवा वेगवान गोलंदाजाबद्दल बोलता त्यावेळी तुम्ही त्याच्यासाठी एक सहकाऱ्याचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला मार्गदर्शनाची गरज असते.

हैदराबादमध्ये दुर्दैवाने ते मिळताना दिसत नाहीये. त्यामुळेच उमरानचा हंगाम असा गेला आहे.

इरफान पठाणने देखील यापूर्वी हैदराबादने उमरानला योग्य प्रकारे हाताळले नसल्याचे सांगितले होते.

लीगमधील सर्वात वेगवान गोलंदाज बाहेर बसतोय हे समजण्यापलीकडचे आहे. उरमान मलिकला त्याच्या संघाने योग्यरित्या हाताळले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.