Bandit Queen : एकेकाळी डाकू अन् नंतर खासदार झालेली ही महिला कोण?

साक्षी राऊत

महिला दरोडेखोर

एका भारतीय महिला दरोडेखोर ते खासदार होण्यापर्यंतचा फूलन देवी यांचा प्रवास विलक्षण आहे.

Bandit Queen

फूलन देवी

फूलन देवी यांच्या कुटुंबाची जमीन ही त्यांच्या काकाने हडपली होती. त्याकारणाने तिची त्यांच्यासोबत भांडणं सुरू होती. फूलन यांनी जमीन मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. यासाठी त्यांनी त्यांच्या काकाच्या मुलाबरोबर भांडणे सुद्धा केली. तिचा राग बघून वयाच्या ११ व्या वर्षी तिचं लग्न लावून दिलं.

Bandit Queen

फार अत्याचार झालेत

फार कमी वयात त्यांना खूप काही सहन करावं लागलं होतं. लग्नानंतर त्यांच्या पतीने सतत जबरदस्ती केली, फूलन यांच्यासाठी तो बलात्कारच होता. फूलनच्या सासरकडच्या लोकांनीही त्यांची फार छळवणूक केली.

Bandit Queen

अत्याचार

सासरी असा अत्याचार झाल्यानं फूलन माहेरी परत आली. घरी परत आल्यावर त्यांच्या काकाच्या मुलाने त्यांच्यावर चोरीचा आरोप लावला. त्यासाठी फूलन यांना ३ दिवसासाठी तुरूंगात जावं लागलं होतं

Bandit Queen

बिकट परिस्थिती

फूलन यांच्या घरची परिस्थिती ही फार बिकट होती. या सर्व गोष्टीला फूलन कंटाळून गेल्या होत्या, त्यांची मैत्र काही वाईट लोकांबरोबर झाली. फूलन यांचे हे मित्र दरोडेखोर होते. या दरोडेखोरांना फूलन या फार आवडत होत्या.

Bandit Queen

या दरोडेखोरांमध्ये फूलनसाठी भांडणे लागली. त्यानंतर दरोडेखोरांचा सरदार असणारा बाबू गुज्जरला विक्रम मल्लाह याने मारलं. बाबू गुज्जरला मारल्यानंतर श्रीराम ठाकूर आणि लाल ठाकूर यांना राग आला होता. या हत्येचा सूड ठाकुरांना घ्यायचा होता.

Bandit Queen

सामुहिक बलात्कार

त्यानंतर फूलन, विक्रम मल्लाह आणि त्यांच्या साथीदारावर ठाकूरांनी हल्ला केला. यात विक्रम मल्लाह मारला गेला. विक्रम मल्लाह मेल्यानं फूलन यांना कैद करण्यात आलं. तिथे तिच्या एक आठवडा सामुहिक बलात्कार झाला.

Bandit Queen

सूड

त्याचा सूड घेण्यासाठी फूलनने ज्या गावाने तिच्यावर अन्याय होताना बघितला त्या गावालाच संपवण्याचे ठरवले.

Bandit Queen

ठाकूरची हत्या

या गावातील २२ ठाकुरांची गोळी मारून फूलनने त्यांची हत्या केली. या घटनेने पूर्ण उत्तप्रदेश हादरून गेलं होतं. यानंतर फूलन यांना 'बँडिट क्वीन' म्हणून प्रसिद्ध मिळाली.

Bandit Queen

पंतप्रधान इंदिरा गांधी घोषणा

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९८३ मध्ये एक घोषणा केली की, फूलन यांची फाशी माफ करण्यात येईल. जर त्यांनी आत्मसमर्पण केलं तर. त्यानंतर फूलन यांनी आत्मसमर्पण केलं. २२ हत्या, ३० दरोडे, १८ अपहरण केल्यानंतर त्यांना कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली झाली.

Bandit Queen

फूलन देवी या ११ वर्ष तुरूंगात कैद होत्या. यानंतर त्यांच्या आयुष्याने एक वेगळं वळण घेतलं. १९९४ रोजी त्यांची सुटका झाली.

Bandit Queen

बँडिट क्वीन’

उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरमधून १९९६ साली निवडणुकीत उतरल्यानंतर, फूलन या निवडणुकीत प्रचंड मताने निवडून आल्या. फूलन व खासदार सुद्धा झाल्या. काही वर्षापूर्वी फूलनदेवी यांच्या जीवनावर ‘बँडिट क्वीन’हा शेखर कपूर यांनी चित्रपट बनवला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandit Queen