Urvashi Rautela : ऋषभ पंत, उर्वशी रौतेला अन् मांग में सिंदूर...

अनिरुद्ध संकपाळ

उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात नुकतेच सोशल वॉर झाले होते.

दोन्ही बाजूंकडून दावे प्रतिदावे करण्यात आले. पंतने उर्वशीसोबत कोणतेही नाते नसल्याचे सांगितले तर उर्वशी पंतसोबत काहीतरी होतं हे सांगण्याचा प्रयत्न करत होती.

दरम्यान, उर्वशी रौतेलाने एक नवा फोटो आपल्या इन्स्टाग्रावर अकाऊंटवर शेअर करत खळबळ उडवून दिली आहे.

उर्वशीने 'मांग में सिंदूर' वाला फोटो शेअर करत त्याला 'सिंदूरशिवाय प्रीय काय असू शकत नाही. पूर्ण रिती रिवाजासहीत ते पाहिजे, आयुष्यभराची साथ हवी.' असे कॅप्शनही दिले.

उर्वशीने काही दिवसांपूर्वी अशीच एक पोस्ट केली होती. त्याला 'कसं विसरू मरण मनुष्याला येतं आठवणींना नाही.' असं दर्द भरं कॅप्शन दिलं होतं.

'कोणी इतकं कसं निष्ठुर होऊ शकतं, कोणाला एखाद्याच्या झुरण्यावर दयाच येऊ नये.' असे म्हणत उर्वशीने एक उदास मुद्रेतला फोटो देखील शेअर केला होता.

उर्वशीने एक इन्स्टा पोस्ट करून तर कळस गाठला. तिने 'पाठलाग होतोय! आणि तो मला ऑस्ट्रेलियाला घेऊन गेला.' अशा कॅप्शनसह #UR1 असा क्रिप्टिक हॅशटॅग वापरून विमानातील आपला फोटो शेअर केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.