IAS अधिकारी रिया दाबी आणि IPS मनीष कुमार यांची 'अशी' आहे Love Story; गुपचूप केलं होतं लग्न

सकाळ डिजिटल टीम

IAS Ria Dabi : रिया दाबी ही राजस्थान केडरमधील 2021 बॅचची IAS अधिकारी आहे. सध्या उदयपूर जिल्ह्यातील गिरवा इथं एसडीएम पदावर कार्यरत आहे.

IAS Ria Dabi

मोठी बहीण टीना दाबीनं 2015 मध्ये UPSC मध्ये भारतात प्रथम क्रमांक मिळवला होता, तर रिया दाबीनं 2020 मध्ये पहिल्याच प्रयत्नात 15 वा क्रमांक मिळवला होता.

IAS Ria Dabi

मनीष कुमारनं UPSC नागरी सेवा परीक्षा 2020 मध्येच AIR 581 रॅंक मिळवलं होतं. रिया दाबीप्रमाणंच तोही एससी समाजाचा आहे. LBSNAA प्रशिक्षणादरम्यान दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं बोललं जातंय.

IAS Ria Dabi IPS Manish Kumar

रिया दाबी आणि मनीष कुमार दोघंही दिल्लीचे रहिवासी आहेत. रिया दाबी बीएसएनएल कॉलनी, कालीबारी मार्ग, नवी दिल्ली इथं राहते, तर मनीष कुमार दिल्लीतील पीतमपुरा येथील आहे.

IAS Ria Dabi IPS Manish Kumar

एप्रिल 2023 मध्ये IAS रिया दाबीनं IPS अधिकारी मनीष कुमार यांच्याशी गुपचूप लग्न केलं. लग्नानंतर दोघांनीही एकमेकांसोबतचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

IAS Ria Dabi IPS Manish Kumar

राजस्थानच्या भजनलाल शर्मा सरकारनं 5 जानेवारी 2024 रोजी रिया दाबीची उदयपूर जिल्ह्यातील गिरवा इथं SDM म्हणून नियुक्ती केलीये. यापूर्वी रिया अलवरमध्ये कार्यकरत होती.

IAS Ria Dabi IPS Manish Kumar

आता व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्तानं रिया दाबीसाठी आनंदाची बातमी म्हणजे, तिचे पती आयपीएस मनीष कुमार यांनाही उदयपूर जिल्ह्यात पोस्टिंग देण्यात आली आहे.

IAS Ria Dabi IPS Manish Kumar

UPSC Success Story : वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'मुद्रा' बनली IAS अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.