'व्हॅलेंटाईन डे' स्पेशल बनवायचा आहे? मग, अशा पद्धतीने जोडीदाराला द्या सरप्राईझ,

Monika Lonkar –Kumbhar

व्हॅलेंटाईन डे

जगभरात दरवर्षी १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज हा प्रेमाचा दिवस आहे.

Valentine day

या प्रेमाच्या दिवसापूर्वी रोझ डे, प्रपोझ डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे इत्यादी प्रकारचे दिवस साजरे केले जातात. त्यानंतर, आज हा व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो.

Valentine day

सेलिब्रेशन

जे कपल्स एकमेकांवर नितांत प्रेम करतात त्यांना हा व्हॅलेंटाईन डे खास प्रकारे साजरा करायचा असतो. जेणेकरून त्यांचा जोडीदार खूश होईल आणि त्यांच्यातील नाते आणखी घट्ट होईल.

Valentine day

तुम्ही व्हॅलेंटाईन डे विविध प्रकारे साजरा करू शकता. आज व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्ही देखील तुमच्या पार्टनरला गोड सरप्राईझ देऊन खुश करू शकता.

Valentine day

कॅंडल लाईट डिनर करा प्लॅन

व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही निवांत क्षण घालवण्यासाठी कॅंडल लाईट डिनरचा प्लॅन करू शकता. कॅंडल लाईट डिनरमुळे तुम्हाला एकमेकांना सोबत छान वेळ घालवता येईल.

Valentine day

जोडीदारासाठी बनवा जेवण

असे म्हटले जाते की, हृदयापर्यंत पोहचण्याचा मार्ग हा पोटातून जातो. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या पार्टनरचे मन जिंकून घेण्यासाठी मस्त जेवण बनवू शकता. जोडीदाराला सरप्राईझ देण्याचा आणि तिचे किंवा त्याचे मन जिंकून घेण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे.

Valentine day

एकमेकांना भेटवस्तू द्या

हृदयातील भावना व्यक्त करण्याचे काम भेटवस्तू करते, असे म्हटले जाते. कोणत्याही खास प्रसंगी भेटवस्तू देऊन तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रभावित करू शकता. व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्ही तुमच्या पार्टनरला आवडणारी कोणतीही एखादी भेटवस्तू देऊ शकता.

Valentine day

पहिल्यांदाच परदेश वारी करताय? मग, फॉलो करा 'या' टिप्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

International Trip