कोकण : कड्यांनी पांघरलाय रंगीबेरंगी फुलांचा शेला; पर्यटकांची हजेरी

शिरीष दामले

दीपकाडीसह इतर फुलांचा नजारा पाहायचा असेल तर साडवलीच्या परिसरात पसरलेला साडेतीन एकराचा परिसर एकदम योग्य ठरतो.

मे च्या सुरवातीला येथील कोचांना फुले येतात, ही पिवळी वा गुलाबी अशी असतात.

गवत झाल्यावर आषाढात होणारी म्हणून आषाढ हंबेआम्री असे स्थानिक नाव असलेली वनस्पती पांढऱ्या फुलांसह डोलत असते.

थोड्या कालावधीत रानकांदा, कोईशिरड असे लिलीचे प्रकार फुलतात, त्यांची फुले पांढरी वा गुलाबी छटेची असतात.

साधारणपणे प्रामुख्याने तीन प्रकारचे गवत त्या सड्यांवर वाढते. त्याशिवाय वेगवेगळी शेवाळे आढळतात. खळगे, छोटी डबकी येथे पाणथळ वनस्पती उगवतात.

कातळावर पाणी कमी, मातीही कमी. अशा प्रतिकूल परिस्थितीत या वनस्पती वाढत असतात. दवबिंदू नामाभिदान झालेली वनस्पती चक्क कीटकभक्ष्यी आहे.

सीतेची आसवं म्हणून ओळखली जाणावी वनस्पती आणि फुले मुळूमुळू नाहीत, ती मांसभक्ष्यी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.