Vastu Tips : देवघरात चुकूनही ठेवून नका देवाची अशी मूर्ती, नाहीतर...

धनश्री भावसार-बगाडे

वास्तूशास्त्र

वास्तूशास्त्रानुसार घरात कोणत्या वस्तू कुठे ठेवावे याचे नियम आहेत, नाहीतर वाईट परिणाम भोगावे लागतात. तसेच नियम देवधरात देवाच्या कोणत्या मूर्त्या कुठे आणि कशा ठेवाव्या याचे नियम आहेत.

Vastu Tips | esakal

देवघर कुठे असावे?

घरात देवघर इशान्य कोपऱ्यात असावे. देवघराचे तोंड पूर्व-पश्चिम असावे, उत्तर दक्षिण असू नये.

Vastu Tips | esakal

देवांच्या उग्र मूर्त्या

देवी देवतांच्या उग्र स्वरुपातील मूर्त्या देवघरात ठेवू नये. जसे काली माता, भैरव, राहू-केतू किंवा कोणत्याही रागीट मूद्रेतील देवी-देवतांची मूर्ती देवघरात असू नये. घराच्या सुख, शांतीसाठी नेहमी सौम्य आणि आशीर्वाद देणारी मूद्राच असावी.

Vastu Tips | esakal

शिवलिंगाचा आकार

शिवलिंग कधीही फार मोठ्या आकाराचे नसावे. हाताच्या अंगठ्या एवढे किंवा त्यापेक्षा लहानच असावे.

Vastu Tips | esakal

नटराज मूर्ती

देवघरात शंकराची मूर्ती असणे चांगले असले तरी नटराजाची मूर्ती कधीच नसावी. कारण ते शंकराचे तांडव रुप आहे. यामुळे घरात क्लेष वाढू शकतात.

Vastu Tips | esakal

लक्ष्मीची उभी मूर्ती

देवघरात लक्ष्मीची मूर्ती नेहमीच कमळावर बसलेली असावी. उभी असू नये. नाहीतर घरात पैसा टिकत नाही.

Vastu Tips | esakal

पंचमुखी हनुमान

देवघरात हनुमानाची मूर्ती हे समृद्धीचे प्रतिक आहे. पण कधीही पंचमुखी हनुमानाची मूर्ती, फोटो असू नये.

Vastu Tips | esakal

खंडित मूर्ती

देवघरात कधीच कोणतीच खंडीत मूर्ती नसावी. जर एखादी मूर्ती खंडित झालीच तर लगेच ती देवघारून काढून टाकावी.

Vastu Tips | esakal

एकाच देवाच्या जास्त मूर्त्या

देवघरात कधीच एकाच्या देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्त्या असू नये. यामुळे धनधान्याची हानी होते.

Vastu Tips | esakal

शनिदेव मूर्ती

शनिची दृष्टी कष्टदायी मानली जाते. त्यामुळे कधीच शनिदेवाची मूर्ती देवघरात ठेवू नये. यामुळे घरात अशांती निर्माण होऊ शकते.

Vastu Tips | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vastu Tips | esakal