Anuradha Vipat
'द डर्टी पिक्चर' हा चित्रपट विद्या बालनच्या करिअरमधील मैलाचा प्रवास ठरला. अभिनेत्रीच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी मानली जाते.
या चित्रपटासाठी विद्या बालनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. पण जेव्हा विद्या बालनने 'द डर्टी पिक्चर' केला आणि लोकांनी ट्रेलर पाहिला तेव्हा तिच्यावर बरीच टीका झाली.
विद्या बालनला तिचं करिअर बरबाद होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.44 वर्षीय विद्या बालनने गोव्यात सुरू असलेल्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान (IFFI 2023) हा खुलासा केला.
विद्या बालनने 'द डर्टी पिक्चर'मध्ये सिल्क स्मिताची भूमिका का केली आणि त्यानंतर तिला लोकांकडून काय प्रतिक्रिया मिळाल्या हे सांगितले.
जेव्हा विद्या बालनला 'द डर्टी पिक्चर'मध्ये बघितले तेव्हा लोकांची तारांबळ उडाली. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, लोक थेट तिच्याकडे आले आणि तिने काय केले हे विचारू लागले.
विद्या बालन म्हणाली, 'माझ्या 'द डर्टी पिक्चर' चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांनी मला सांगितले की, ट्रेलर पाहिल्यानंतर आम्ही तुझा चित्रपट अजिबात पाहणार नाही.
जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा लोकांनी मला सांगितले होते की तू चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सेक्सचा वापर करत आहेस.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.