'या' 2 मराठी अभिनेत्रींवर फिदा विजय देवरकोंडा!

प्रणाली मोरे

विजय देवरकोंडा सध्या त्याच्या 'लाइगर' सिनेमामुळे भलताच चर्चेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून तो बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.

Esakal

'लाइगर' सिनेमा सध्या विजय देवरकोंडाच्या एका वक्तव्यासोबतच 'लाल सिंग चड्ढा'ला त्यानं पाठिंबा दिल्यामुळे गोत्यात आला आहे. ट्वीटरवर 'लाइगर' विरोधात बॉयकॉटची मागणी केली जात आहे.

Esakal

विजयने एका प्रमोशनल कार्यक्रमात बॉयकॉट ट्रेन्डविषयी बोलताना म्हटलं होतं की,''हे होतच राहणार, ज्यांना सिनेमा थिएटरमध्ये पहायचाय त्यांनी पहावा, ज्यांना पहायचा नाही त्यांनी नंतर फोन किंवा टी.व्हीवर पहावा''.

Esakal

विजय देवकोंडाच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर ट्रोलर्सनी त्याच्यावर निशाणा साधत 'बॉयकॉट लाइगर' ट्रेन्ड सुरू केला. त्यानंतर मात्र विजयनं आपला सूर बदलला आणि त्यानंतर तो आपल्या स्ट्रगलची दर्दभरी कहाणी कार्यक्रमात सांगत फिरू लागला. यामुळे विजय बॉयकॉट ट्रेन्डला घाबरला असं म्हटलं जात आहे.

Esakal

आता विजय पुन्हा चर्चेत आला ते 'डान्स इंडिया डान्स सुपरमॉम'च्या मंचावर त्याच्या क्रश विषयी मोठा खुलासा केल्याने.

Esakal

विजय देवरकोंडाने या शो मध्ये जाऊन सांगितलं की मी भाग्यश्री आणि उर्मिला मातोंडकर यांचा जबरदस्त फॅन आहे. मी आतापर्यंत त्यांचा एकही सिनेमा चुकवलेला नाही. त्या दोघीही माझ्या क्रश होत्या आणि अजूनही माझं थोडं क्रश आहेच दोघींवरही. विजयच्या या बोलण्याने भाग्यश्री आणि उर्मिला मात्र लालबुंद झालेल्या पहायला मिळाल्या.

Esakal

विजय देवरकोंडा दक्षिणेतील प्रेक्षकांचा हार्टथ्रोब आहेच पण बॉलीवूडमध्येही त्याचं तगडं फॅनफॉलॉइंग आहे. त्याचा 'लाइगर' २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. आता पहायचं बॉयकॉट ट्रेन्डमध्ये 'लाइगर'ही फसतो, की विजय देवरकोंडाची जादू काम करुन जाते,अन् 'लाइगर' सुपरहिट ठरतो. जस्ट वेट अॅन्ड वॉच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal