वीरदासला 'इमी' ट्रॉफीसह विमानतळावर अडवलं अन्...

Amit Ujagare (अमित उजागरे)

अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन वीरदासनं आपला पहिला आंतरराष्ट्रीय इमी पुरस्कार पटकावला.

Vir Das Emmy Trophy

नेटफ्लिक्सवरचा खास शो 'वीर दास लँडिंग'साठी त्याला या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

Vir Das Emmy Trophy

हा प्रतिष्ठेचा पुरस्कार घेऊन भारतात परतल्यानंतर मात्र त्याला एका विचित्र अनुभवाला सामोरं जावं लागलं.

Vir Das Emmy Trophy

बंगळुरुच्या एअरपोर्टवर त्याला सिक्युरिटी चेक स्टाफनं त्याची बॅग चेक केली. त्यात धारदार शस्त्र असलेली मुर्ती असल्याचं त्यांनी म्हटलं.

Vir Das Emmy Trophy

पण वीरदासनं त्याला समजावून सांगितलं की, ती इमीची ट्रॉफी आहे. त्याला पंख आहेत, ती मुर्ती नाही.

Vir Das Emmy Trophy

त्यानं आपली बॅग उघडून दाखवली, त्यानंतर ती ट्रॉफी पाहून अधिकाऱ्यानं त्याचं अभिनंदन केलं.

Vir Das Emmy Trophy

अधिकाऱ्यानं त्याला विचारलं, तू काय करतोस? त्यावर वीरदास म्हणाला "मी जोक सांगतो"

Vir Das Emmy Trophy

यावर जोक सांगायचा पण पुरस्कार मिळतो का? असं त्याला चेकर म्हणाला. त्यावर तो म्हणाला, मला पण हे जरा विचित्रच वाटलं. त्यावर दोघेही खळखळून हसले.

Vir Das Emmy Trophy

त्यानंतर वीरदासनं आपली ट्रॉफी बॅगेत ठेवली आणि तो पुन्हा पुढच्या प्रवासासाठी निघून गेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vir Das Emmy Trophy